अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली छाप निर्माण करताना बॉलिवूडमध्येही स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. तिने हिंदी चित्रपटांमध्ये जरी काम केलं नसलं तरी बॉलिवूड चित्रपट पाहणारे असंख्य प्रेक्षक तिचे चाहते आहेत. तिचे नाव आज भारतातल्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच तिने तिच्या मानधनात देखील चांगलीच वाढ केल्याचं आता समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथा ‘पुष्पा’ चित्रपटात झळकल्यापासून चाहत्यांमध्ये तिची चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे. चित्रपटातील ‘ऊ उंटावा’ या आयटम साँगमधून समांथाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. या गाण्याला आणि या गाण्यातील तिच्या नृत्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या गाण्यामुळे तिला नवी ओळख मिळाली. त्याचबरोबर तिचं फॅन फॉलोइंगही प्रचंड वाढलं.

आणखी वाचा : समांथा रुथ प्रभूने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल थक्क

समांथा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येते. तर पुष्पा नंतर तिने तिच्या मानधनांमध्ये आणखीनच वाढ केली आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर करायला ती लाखो रुपये आकारते. इंस्टाग्रामवर २४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर तिच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी ती इंस्टाग्रामवरून चाहत्यांशी शेअर करत असते. एका मीडिया रिपोर्टनुसार, समंथा सध्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून महिन्याला २ कोटींहून अधिक कमाई करत आहे. ती आरोग्याशीसंबंधित आणि फॅशनच्या ब्रँडला प्रमोट करते. तर आता तिने तिची फी ८ ते १० लाख रुपये प्रति पोस्टवरून २० लाख रुपये केली आहे.

हेही वाचा : भव्य खोल्या, प्रायव्हेट मूव्ही थिएटर आणि…; ‘इतक्या’ कोटींचा आहे शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला

त्यामुळे तिने आता तिच्या मानधनात दुपटीने वाढ केली आहे. आता ती फक्त मोठ्या पडद्यावरच जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून नाही तर सोशल मीडियावर ब्रॅण्ड्सना प्रमोट करण्याच्या बाबतीतही अधिक मानधन आकारणारी अभिनेत्री बनली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South actress samantha ruth prabhu has increased her fee for social media posts rnv