प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला मैत्रिणीच्या घरी चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या अभिनेत्रीचं नाव सौम्या शेट्टी उर्फ सौम्या किल्लमप्लेला असून ती सोशल मीडिया स्टार देखील आहे. आंध्र प्रदेशच्या विझाग शहर पोलिसांकडून चोरीच्या प्रकरणात तिला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच भारतीय पोस्ट विभागातून निवृत्त झालेल्या प्रसाद बाबू यांनी त्यांच्या घरातून १५० तोळे सोने चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. गेल्या काही दिवसांत प्रसाद बाबूंच्या फ्लॅटवर सौम्या शेट्टी त्यांच्या मुलीला म्हणजेच मोनिकाला सतत भेटण्यासाठी जात होती. यादरम्यान तिने कुटुंबीयांची जीवनशैली आणि घरातील मौल्यवान वस्तूंचं बारकाईने निरीक्षण केलं. प्रसाद बाबूंच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून पुढे सौम्याने त्यांच्या बाथरूम, बेडरुममध्ये प्रवेश करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिल्या. विश्वाचा गैरफायदा घेऊन सौम्याने चोरी केल्याचा आरोप प्रसाद बाबूंनी केला आहे.

हेही वाचा : “राजकारणात गेलो तर दुसऱ्या दिवशी…”, शेतकरी संमेलनात नाना पाटेकरांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले, “कोणतं सरकार…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना घडली तेव्हा संपूर्ण कुटुंबीय बाहेर होते. लग्न आटोपून घरी परत आल्यावर मोनिकाच्या कुटुंबीयांना सोनं हरवल्याचं लक्षात आलं आणि चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी बोटांचे ठसे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असता याआधारे ११ जण संशयाच्या भोवऱ्यात आले.

हेही वाचा : Video: अमृता फडणवीस लेकीसह जामनगरहून परतल्या माघारी, दिविजाचा ग्लॅमरस एअरपोर्ट लूक चर्चेत

पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर सौम्या शेट्टीसह ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीदरम्यान सौम्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून ७४ ग्रॅम सोने पोलिसांनी जप्त केलं आहे. सोन्याची चोरी केल्यानंतर सौम्या गोव्यात पळून गेली होती. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. असं वृत्त एएनआयने दिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South actress soumya shetty arrested in gold theft case sva 00
Show comments