अभिनय आणि सौंदर्याच्याही बाबतीत ऐश्वर्या राय बच्चनला मागे टाकणाऱ्या त्रिशा कृष्णनची सध्या चांगलीच चर्चा आहे. ‘PS-2’मध्ये त्रिशा ऐश्वर्यावर चांगलीच भारी पडल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे. आज त्रिशाचा वाढदिवस. याच निमित्ताने तिच्या खासगी आयुष्यातील काही महत्त्वाच्या आणि वादग्रस्त घटनांबद्दल जाणून घेणार आहोत.

४ मे १९८३ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या त्रिशाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्रिशा सध्या ‘PS-2’मुळे चांगलीच चर्चेत असली तरी याआधीही तिने अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम कामे केली आहेत. दाक्षिणात्य चित्रपटात त्रिशाचीच चलती आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. तमिळ-तेलुगू चित्रपटांतून नाव कमावलेल्या त्रिशाने बॉलीवूडच्याही अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Premachi Gosta
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये मुक्ता टाकीत बुडतानाचा सीन ‘असा’ झाला शूट; पाहा व्हिडीओ
Raja Ranichi Ga jodi Fame Actress Kelvan
फिश फ्राय, सोलकढी, गोडाचे पदार्थ अन्…; ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्रीचं ‘असं’ पार पडलं केळवण, फोटोंनी वेधलं लक्ष
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”

आणखी वाचा : हॉलीवूडमधील ११,५०० लेखक संपावर; वेतनवाढीबरोबरच ‘AI’चा वापर थांबविण्याची केली मागणी

त्रिशा तिच्या अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यातील वादांमुळेच बरीच चर्चेत आली. त्रिशाचे नाव सर्वप्रथम साऊथचा सुपरस्टार विजयसोबत जोडले गेले होते. २००५ मध्ये त्रिशा आणि थलपथी विजयच्या कथित अफेअरची चांगलीच चर्चा रंगली. ‘घिल्ली’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. त्यामुळे विजयचे वैवाहिक आयुष्यही अडचणीत आले होते. मात्र नंतर ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर त्रिशाचे नाव बाहुबली फेम राणा डग्गुबतीशी जोडले गेले. दोघेही अनेक वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. याचा खुलासा खुद्द राणा डग्गुबतीने कॉफी विथ करणच्या मंचावर केला होता.

जेव्हा त्रिशा आणि राणा रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा दोघांचे इंटिमेट फोटो लीक झाले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. मात्र, त्रिशाने या मुद्द्यावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्रिशाने डिसेंबर २०१५ मध्ये उद्योगपती वरुण मनियानबरोबर साखरपुड्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, पाच महिन्यांनंतर त्रिशा आणि वरुणचे नाते तुटले. हा साखरपुडा मोडण्यामागे दाक्षिणात्य अभिनेता धनुष असल्याचे म्हटले जाते. धनुष आणि त्रिशामधील मैत्री ही वरुणला खटकत असल्याने त्यांचे हे नातेही संपुष्टात आले.

आणखी वाचा : ‘TDM’चे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचं धक्कादायक विधान; म्हणाले, “आता…”

याबरोबरच त्रिशा दक्षिण भारतासाठी पेटाची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहे. त्यादरम्यान त्यांनी जल्लीकट्टूविरोधात वक्तव्य केले होते. त्रिशाने पेटाला पाठिंबा दिल्याने लोक तिच्यावर नाराज झाले. अशा परिस्थितीत तिला स्वतःचे ट्विटर अकाऊंटही बंद करावे लागले. अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा त्रिशाच्या करिअरमध्ये अडथळे आले, पण तरी तिची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे.

Story img Loader