सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाक्षेत्रालाच दुःखद धक्का बसला. आता यानंतर आणखी एक दुःखद घटना घडली आहे. साऊथ आफ्रिकाचा सुप्रसिद्ध रॅपर कोस्टा टिचचं निधन झालं आहे. तो २७ वर्षांचा होता. ११ मार्च (शनिवारी) जोहान्सबर्ग येथे अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये कोस्टा परफॉर्म करत होता. परफॉर्म करत असतानाच तो स्टेजवर कोसळला. यादरम्यानचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “१५ कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली” पत्नीच्या आरोपावर व्यावसायिकाचं उत्तर, म्हणाला, “होळी पार्टीच्या…”

कोस्टाचा परफॉर्मन्स करतानाचा व्हिडीओ पाहून चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये परफॉर्म करत असताना पहिल्यांदा कोस्टा धडपडतो. मात्र तो सुरुवातीला स्वतःला सावरताना दिसतो. कोस्टा परत परफॉर्म करू लागतो. पण दुसऱ्यांदा तोल गेल्यानंतर कोस्टा स्टेजवरच कोसळल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

कोस्टाला पाहण्यासाठी, त्याचे रॅप ऐकण्यासाठी या फेस्टीव्हलमध्ये हजारोंची गर्दी जमली होती. कोणी त्याचे व्हिडीओ काढत होतं तर कोणी टाळ्या वाजवत त्याच्या रॅपला प्रोत्साहन देत होतं. कोस्टा स्टेजवर अचानक कोसळल्यानंतर काही मिनिटांसाठी नेमकं काय घडलं? हे उपस्थितांनाही कळलं नाही.

आणखी वाचा – Video : निधनाच्या काही तासांपूर्वी दिल्लीमधील होळी पार्टीमध्ये बेभान होऊन नाचले होते सतीश कौशिक, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

डोळ्यांसमोरच कोस्टाचं निधन झाल्यामुळे या फेस्टिव्हलला उपस्थित असलेल्या मंडळींना दुःखद धक्का बसला आहे. कोस्टाचं खरं नाव कोस्टा त्सोबानोग्लू असं आहे. कोस्टा टिच या नावाने त्याला ओळखलं जात होतं. युट्यूबवरही त्याच्या अनेक गाण्यांना मिलियनच्या घरात व्ह्यूज आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South african rapper costa titch dies at the age of 27 his last video from festival goes viral on social media see details kmd