दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय. उत्तम अभिनयासोबतच तमन्नाने तिच्या सौदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे. तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्याचसोबत अनेकदा तमन्ना चाहत्यांसोबत ब्युटी टीप्सदेखील शेअर करत असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच पिंक व्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत तमन्नाने चेहऱ्यासाठी सकाळीच लाळ उपयुक्त असल्याचं म्हटंलं आहे. तमन्नाला तिने आजवर चेहऱ्याला लावलेली विचित्र गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आधी तमन्नाने तिने एकदा चेहऱ्याला कोणती तरी माची आणि अ‍ॅपल साईडर व्हिनेगरचा लेप लावला असल्याचं सांगितलं. पुढे तमन्ना म्हणाली, “कदाचित हे तुमच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असले, ऐकायला जरा विचित्र वाटतं असलं तरी सकाळीची लाळ मी लावली आहे. पण ती खरचं त्वचेसाठी गुणकारी असते.” असं तमन्ना म्हणाली.

पुढे तमन्नाने चाहत्यांना एक सल्ला देखील दिला. जर एखाद्याला त्वचेच्या जास्त समस्या असतील तरी त्याने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली. तमन्ना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अनेकदा त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी चाहत्यांनी टिप्स देत असते. तसचं तमन्ना फिटनेस प्रेमी असून वर्क आऊटचे व्हिडीओ ती शेअर करत असते.

हे देखील वाचा: “कोला शोला सब अपनी जगह”; रोनाल्डोच्या अनेक वर्ष आधीच करीना कपूर Coca-Cola बद्दल म्हणाली होती…

हे देखील वाचा: अक्षय कुमारमुळे ट्विंकल खन्नाला झाली होती अटक; चारचौघांत करायला लावलं होतं ‘ते’ कृत्य

तमन्ना लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चुडिंया’ या सिनेमात झळकणार आहे. यासोबत ती तेलगू भाषाते लवकरच येणाऱ्या ‘मास्टर शेफ’ या शोमध्ये होस्टच्या रुपाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South and bollywood actress tamannaah bhatia said morning saliva good for skin share beauty tips with fans kpw