सुप्रसिद्ध दाक्षिणात्या अभिनेत्री मीना (Meena) यांचे पती विद्यासागर (Vidyasagar) यांचे सोमवारी २७ जून रोजी संध्याकाळी चेन्नई येथील एका खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांना फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. गेल्या काही दिवसांपासून चेन्नई येथील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेरीस फुफ्फुसाच्या आजारामुळे रुग्णालयामध्येच त्यांची प्राणज्योत माळवली.

आणखी वाचा – Photos : अमृता फडणवीस यांच्या हटके लूकची चर्चा, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…E

अभिनेते सारथ कुमार यांनी ट्विट करत विद्यासागर यांचं निधन झालं असल्याची माहिती दिली. विद्यासागर हे बंगळूर येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक होते. २००९मध्ये मीना आणि विद्यासागर यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. मीना आणि विद्यासागर यांना नैनिका नावाची गोंडस मुलगी देखील आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी २९ जून रोजी चेन्नई येथे विद्यासागर यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. विद्यासागर यांच्या निधनाची बातमी ऐकताच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील काही कलाकारांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेते सारथ कुमार यांनी ट्विट करत म्हटलं की, “अभिनेत्री मीना यांचे पती विद्यासागर यांचे निधन झालं असल्याची बातमी ऐकून मी सुन्न झालो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.”

आणखी वाचा – Photos : शरद पोंक्षे यांचा मुलगा कोण आहे माहितेय का? ‘धर्मवीर’ चित्रपटासाठीही केलंय काम

मीना यांनी बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बालकलाकार म्हणून मीना यांनी त्यांच्या करिअरला सुरुवात केली. नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेले त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील टॉपच्या कलाकारांबरोबर देखील त्यांनी काम केलं आहे.

Story img Loader