दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री हमसा नंदिनी हिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. नंदिनीला ग्रेड ३ चा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी नंदिनीने तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी ती फार आनंदित पाहायला मिळत होती. मात्र त्यानंतर तिच्या या पोस्टमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. तिने या पोस्टसोबत तिचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोही शेअर केला आहे. यात तिने तिचे केस कापल्याचे पाहायला मिळत आहे. यासोबत नंदिनीने एक लांबलचक पोस्टही शेअर केली आहे. याद्वारे तिने तिला स्तनाचा कॅन्सर झाल्याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांपूर्वी नंदिनीच्या आईचेही ब्रेस्ट कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यानंतर आता नंदिनीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

हमसा नंदिनीची संपूर्ण पोस्ट

“आयुष्यात कोणतेही वळण आले किंवा कधी, कितीही अन्यायकारक वाटले तरी मी पीडित होण्यास नकार देते. मी भीती, निराशावाद आणि नकारात्मकतेने जगण्यास नकार देते. मी काहीही सोडणार (Quit) नाही. प्रेम आणि धैर्याच्या जोरावर मी पुढे चालत राहिन आणि लढा देईन.
जवळपास ४ महिन्यांपूर्वी मला माझ्या स्तनात गाठ जाणवली. त्याच क्षणी मला माहित होते की आता माझे आयुष्य जसे सुरु आहे, तसे ते चालणार नाही.”

“या आजाराने १८ वर्षांपूर्वी मी माझी आई गमावली. तेव्हापासून मी या आजाराच्या छायेत आहे. मी प्रचंड घाबरले होते. त्यानंतर काही तासाने मी क्लिनिकमध्ये आली आणि गाठ तपासली. त्यांनी मला सर्जिकल ऑन्कोलॉजिस्टला भेटायला सांगितले. त्यावेळी त्यांनी मला बायोप्सी करण्याचा सल्ला दिला. बायोप्सी करण्याच्या सल्ल्यानंतर माझी सर्व भीती खरी असल्याचे सिद्ध केले. मला ग्रेड ३ इनवेसिव्ह कार्सिनोमा (स्तन कर्करोग) असल्याचे निदान झाले.” असे हमसा नंदिनी हिने म्हटले आहे.

“अनेक स्कॅन्स आणि चाचण्यांनंतर मी धैर्याने ऑपरेशन थिएटरमध्ये गेली, या ठिकाणी माझी ती गाठ काढण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी कॅन्सर शरीरात कुठेही पसरला नसल्याचे मला सांगितले. तसेच मी त्याचे वेळीच निदान केल्याचेही त्यावेळी त्यांनी म्हटले. पण माझा हा आनंद जास्त काळ टिकला नाही कारण मला आनुवंशिक स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळले.”

“याचा अर्थ माझ्या शरीरात अनुवांशिक म्यूटेशन आहेत. ज्यामुळे मला आयुष्यात दुसरा स्तनाचा कर्करोग होण्याची ७० टक्के शक्यता आहे. तर ४५ टक्के गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. हे टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यावरील शस्त्रक्रिया. ज्या मला कराव्या लागतील. आतापर्यंत मी ९ वेळा केमोथेरपी केली असून अजून ७ वेळा केमोथेरपी करावी लागणार आहे,” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भर कार्यक्रमात अभिषेक बच्चनचा झाला होता अपमान, दुसऱ्या अभिनेत्यामुळे मिळाली ‘अशी’ वागणूक

हमसा नंदिनीने या पोस्टमध्ये तिने स्वतःला दिलेल्या वचनांबद्दलचीही माहिती दिली आहे. यावेळी ती चाहत्यांना वचन देत म्हणाली की ती लवकरच जोरदार पुनरागमन करेल. दरम्यान हमसा हिने अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. तिने अभिनेता नागार्जुनसोबतही स्क्रीन शेअर केली आहे. याआधी मनीषा कोईराला, लिसा रे आणि सोनाली बेंद्रे या अभिनेत्रींनी कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरही मात केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South film actress hamsa nandini diagnosed with grade 3 breast cancer shares a powerful note nrp
Show comments