दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटातील त्याच्या स्टाइलची, डायलॉगची चाहत्यांना भूरळ पडली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक महिने उलटल्यानंतरही पुष्पाची क्रेझ आजही कायम आहे. सोशल मीडियावर अजूनही ‘पुष्पा’ चित्रपटातील रिल्स व्हायरल होताना दिसतात.
‘पुष्पा’ नंतर या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी प्रेक्षक आतुर आहेत. ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटाचे छायाचित्रकार कुबा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अल्लू अर्जुन बरोबरचा शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी “उत्कंठावर्धक प्रवास सुरू…थॅंक यू आयकॉन स्टार”, असं कॅप्शन दिलं आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा >> “खूप सारं प्रेम आणि…”, समांथाच्या आजाराबद्दल समजताच नागा चैतन्याच्या भावाने केलेली कमेंट चर्चेत
हेही वाचा >> “माणूस निघून गेला की समजतं…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, शेअर केली भावूक पोस्ट
१७ डिसेंबर २०२१ ‘पुष्पा : द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटात अल्लू अर्जुनसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती. रश्मिकालाही या चित्रपटामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा >> Video: प्रमोशनदरम्यान कतरिना कैफ ‘हाऊ इज द जोश’ म्हणाली अन्…; व्हायरल व्हिडीओ पाहा
‘पुष्पा २: द रुल’ या सिक्वेलसाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नव्या भागात जास्त ऍक्शन आणि मसाला पाहायला मिळणार असल्याने चाहते आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट बघत आहेत.