दाक्षिणात्य अभिनेता नानी सध्या त्याच्या ‘दसरा’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नानीने अनेक चित्रपटांतून काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘हिट’, ‘जर्सी’, ‘मख्खी’, ‘पैसा’ यांसारख्या चित्रपटांमधून नानीने अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या नानाी ‘दसरा’ चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचा टीझरपासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. अभिनेत्याने चित्रपटातल्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे.
नानी सध्या प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये गेला असताना त्याने माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा तो असं म्हणाला, “या चित्रपटाचे चित्रीकरण करणे खूपच कठीण होते. तेलंगणामधील गोदावरीखणी येथील सिंगरेनी कोळसा खाणींच्या येथे आम्ही चित्रीकरण करत होतो. चित्रीकरण करत असताना कोळशाची धूळ असल्याने चित्रीकरण करणे कठीण गेले होते. धुळीने मला त्रास झाला होता. मी नीट झोपू शकलो नाही पण आता चित्रपट पूर्ण झाल्यावर असे वाटते की मेहनत वाया गेली नाही.”
‘दसरा’ स्टार नानीला पडली बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीची भुरळ; म्हणाला…
तो पुढे म्हणाला, “चित्रीकरणादरम्यान आम्हाला त्रास व्हायचा पण पॅकअप नंतर आम्ही बघायचो तेव्हा गोष्टी एकदम योग्य वाटत होत्या. होय, मी एक गोष्ट सांगायलाच पाहिजे की चित्रीकरणादरम्यान कोणतीही मजेदार परिस्थिती नव्हती. जेव्हा दिग्दर्शकाला माझे डोळे लाल हवे होते तेव्हा मी दारूचे सेवन केले होते.” असे त्यांनी सांगितले.
नानी मुख्य भूमिकेत असलेला ‘दसरा’ चित्रपट येत्या ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तेलुगुबरोबरच तमिळ, हिंदी, मल्याळम व कन्नड या भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नानीसह किर्ती सुरेश, साई कुमार हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.