अभिनय आणि कलागुणांना नेहमीच अग्रगण्य स्थान देणाऱ्या मराठी चित्रसृष्टीत अमराठी कलाकारांचा सातत्याने वावर आढळतोय. मराठी चित्रपटक्षेत्रात येणाऱ्या या कलावंतांमध्ये आत्ता आणखी एक नाव नोंदवले जाणार आहे. साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री निधी ओझा हिचे आत्ता मराठीत पदार्पण होत असून ‘टाईम बरा वाईट’ या चित्रपटात तिच्या अभिनयाची झलक रसिकांना पाहायला मिळणार आहे.
nidhi450
घड्याळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच कधी चांगल्या तर कधी वाईट वेळेशी सामना करावा लागला आहे. धावपळीच्या दुनियेत वेळेचे महत्त्व कुणालाच टाळता येत नाही. हाच धागा पकडत ‘टाईम बरा वाईट’ हा नवा अॅक्शनपट येत आहेत. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे प्रसिध्द संकलक राहुल भातणकर यांनी या चित्रपटाद्वारा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
‘वी. आर. जी. मोशन पिक्चर्स’ निर्मितीसंस्थेचे विजय गुट्टे प्रस्तुत आणि बाहुल चौधरी, अनुराग श्रीवास्तव सहनिर्मित या चित्रपटात आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, भूषण प्रधान, सतीश राजवाडे, निधी ओझा, सिद्धार्थ बोडके, सुनील पेंडुरकर, नुपूर दुधवडकर, राजेश भोसले, प्रणव रावराणे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. १९ जूनपासून ‘टाईम बरा वाईट’ सर्वांच्या मनोरंजनास सज्ज आहे.

Story img Loader