कलाकारांचं खासगी आयुष्य कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. कलाकार मंडळी आपल्या नात्याबाबत किंवा कुटुंबाबत बोलणं टाळत असले तरी त्याबाबत रोज नव्या चर्चा रंगतात. आता असाच एक सुप्रसिद्ध अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेता बबलू पृथ्वीराजने वय वर्ष २३ असलेल्या मुलीशी लग्न केलं असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. आता अभिनेत्यानेच याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – तीन वर्षं रिलेशनशिप, एकत्र चित्रपट अन् आता वाद; हुमा कुरेशीचं बॉलिवूड दिग्दर्शकाबरोबर ब्रेकअप

बबलू पृथ्वीराज ज्या मुलीला डेट करत आहे तिचं नाव शितल आहे. IndiaGlitzला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हटलं की, “या वयात लग्न करण्यामध्ये गैर काय?. एकटेपणा हा मोठा शाप असतो. शितल खूप समजूतदार आहे. तिच्याबरोबर मी लग्न करण्याचा निर्णय घेतला याबाबत मी खूप खुश आहे. ती जेवण खूप चांगलं बनवते. गेल्याच वर्षी आम्ही दोघं एकमेकांना भेटलो. शितलचे विचार स्वच्छ आहेत.”

“मी अजूनही मनाने तरुण आहे. मी फिट आहे. शितलला माझ्या वयाबाबत पूर्ण माहिती आहे. तिच्या कुटुंबीयांना माझ्याबाबत सगळं काही माहित आहे. मग अडचण काय आहे?” असंही बबलू पृथ्वीराज म्हणाला. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत.

आणखी वाचा – Video : अभ्युदयनगरमधील छोटसं घर ते आलिशान फ्लॅट, आदेश बांदेकरांच्या स्वीट होमची झलक पाहिलीत का?

५६ वर्षीय बबलूने १९९४मध्ये बीनाशी लग्न केलं. बबलू-बीनाला २७ वर्षाचा मुलगाही आहे. मुलगा सतत आजारी असल्यामुळे बबलू-बीनाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. तसेच मुलाच्या आजारपणामध्ये दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. काही वर्षांपासूनच दोघांमध्ये वाद सुरु असल्याचं बोललं जातं. तमिळ चित्रपटांमध्ये बबलूने आजवर उत्तम काम केलं आहे. नकारात्मक भूमिकांमुळे तो बराच चर्चेत आला. छोट्या पडद्यावरील बऱ्याच मालिकांमध्येही त्याने काम केलं. १०० पेक्षा अधिक दाक्षिणात्या चित्रपटांमध्ये त्याने आजवर भूमिका साकारल्या.