राम चरण हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘आरआरआर’, ‘येवडू’, ‘चिरुथा’ असे हिट चित्रपट देऊन राम चरणने चित्रपटसृष्टीत त्याची वेगळी ओळख निर्माण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राम चरण सध्या त्याच्या ‘आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. जपानमध्येही त्याच्या या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘आरआरआर’ चित्रपटामुळे यशाचं वेगळं शिखर गाठणाऱ्या राम चरणने आणखी एक गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. राम चरणच्या घरी पाळणार हलणार आहे. त्याची पत्नी उपासना गरोदर असून ते दोघेही लवकरच आई-बाबा होणार आहेत.

राम चरणने सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. “श्री हनुमान यांच्या आशीर्वादाने हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की, राम चरण व उपासना त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमानासाठी उत्सुक आहेत”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा देत राम चरण व त्याच्या पत्नीचं अभिंनदन केलं आहे.

राम चरण व उपासना यांनी २०१२ साली विवाहबद्ध होत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता लग्नाच्या दहा वर्षांनंतर त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याने दोघेही खूश आहेत.