दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजय सध्या चर्चेत आहे. थलपथी विजय व त्याची पत्नी संगीता घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे होणार असल्याच्या चर्चा आहेत. विजय व संगीताचा २३ वर्षांच्या सुखी संसारात अचानक वादळ आल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

थलपथी विजयच्या विकिपीडीया पेजवरील माहितीवरुन त्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अटली कुमारच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या समारंभातही फक्त थलपती विजयने हजेरी लावली होती. विजयची पत्नी संगीता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हती. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा>> ‘तु तेव्हा तशी’ फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा, फोटो व्हायरल

१९९६ मध्ये थलपथी विजय व संगीता पहिल्यांदा एकमेकांना भेटले. संगीता विजयची चाहती होती.  त्याला भेटण्यासाठी ती लंडनहून चेन्नईला आली होती. त्यानंतर विजय व संगीतामध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढले. २५ ऑगस्ट १९९९ रोजी थलपथी विजय व संगीताने विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांना जेसन हा मुलगा व दिव्या ही मुलगी आहे. लग्नाच्या २३ वर्षांनंतर ते वेगळे होणार असल्याच्या चर्चांमुळे चाहतेही संभ्रमात आहेत.

हेही वाचा>> “राखी सावतंमुळे ‘बिग बॉस’ला टीआरपी मिळतो, पण…”, आरोह वेलणकर स्पष्टच बोलला

थलपथी विजयने घटस्फोटाच्या चर्चांवर अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. परंतु, थलपती विजय व संगीता यांच्या घटस्फोटाच्या केवळ अफवा असल्याची माहिती पिंकविलाने दिली आहे. थलपथी विजयच्या जवळच्या व्यक्तीने पिंकविलाला “दोघांमध्ये काहीही बिनसलं नसून संगीता मुलांसह अमेरिकेत सुट्ट्या एन्जॉय करत असल्यामुळे ती कार्यक्रमांना उपस्थित राहू शकली नाही”, अशी माहिती दिली आहे.

Story img Loader