दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण त्यापूर्वी उत्साहाच्या भरात अल्लू अर्जुनकडून मोठी चूक झाल्याचं म्हंटलं जात आहे. त्याने ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटातील डायलॉग लीक केला आहे. याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

अलीकडेच अल्लू अर्जुन आनंद देवरकोंडाचा ‘बेबी’ या चित्रपटाच्या यशानंतर आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित झाला होता. त्यावेळेस उपस्थित असलेले प्रेक्षक अभिनेत्याला ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटावरून चीअर अप करू लागले. याच उत्साहाच्या भरात अल्लू अर्जुनने थेट आगामी ‘पुष्पा २’ चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला. “इथे फक्त एकच नियम चालेल… तो आहे पुष्पाचा नियम”, अभिनेत्याचा तोंडून हा डायलॉग ऐकताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच यामुळे आता ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

हेही वाचा – अभिनेत्री मौनी रॉय ९ दिवसांनंतर हॉस्पिटलमधून परतली; म्हणाली, “प्रकृती…”

हेही वाचा – आलियाप्रमाणे पूजा व महेश भट्टही नाहीत १२ वी पास; अभिनेत्रीने केला खुलासा

एप्रिल महिन्यात ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला होता. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. ज्यामध्ये पुष्पा तुरुंगातून फरार झाल्यामुळे शहरात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे दाखवण्यात आले होते. पुष्पा नेमका कुठे आहे? असा प्रश्न निर्माण झाला होता. तर दुसऱ्या बाजूला लोक पुष्पाने केलेल्या मदतीमुळे त्याचे कौतुक करताना दिसत होते. टीझरच्या शेवटी पुष्पाची झलक दाखवण्यात आली होती.

हेही वाचा – गेट वे ऑफ इंडियासमोर बॉयफ्रेंडला लिपलॉक केल्यामुळे ‘ही’ अभिनेत्री चर्चेत; फोटो झाले व्हायरल

दरम्यान, ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागातील अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या ‘ऊ अंटवा’ या आएटम साँगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. पण आता ‘पुष्पा २’ मध्ये ती आएटम साँग करणार की नाही ही येत्या काळातच समजले.

Story img Loader