kalpana raghavendra commented on her suicide attempt : प्रसिद्ध दाक्षिणात्य गायिका व गीतकार कल्पना राघवेंद्रने ( Kalpana Raghavendra ) ०४ मार्च, मंगळवार रोजी आत्महत्येद्वारे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आले आणि अनेकांना धक्काच बसला. गायिका तिच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली होती. त्यामुळे तिला तातडीने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एबीपी देसमच्या वृत्तानुसार, गायिकेचे घर दोन दिवसांपासून बंद असल्याचे तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून गायिकेच्या घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना कल्पना बेशुद्धावस्थेत आढळली. त्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आता तिच्या आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. गायिकेने स्पष्ट केले की, मुलीशी शिक्षणावरून झालेल्या वादामुळे आणि तणावामुळे तिने निद्रानाशाच्या गोळ्यांचे अतिसेवन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गायिका कल्पना राघवेंद्रने पोलिसांना काय माहिती दिली?

‘केपीएचबी’ पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी कल्पनाचे ( Kalpana Raghavendra ) मुलगी दया प्रसादबरोबर शिक्षणावरून मतभेद झाले. मुलीने हैदराबादमध्येच शिक्षण घ्यावे अशी कल्पनाची इच्छा होती, परंतू दया यासाठी सहमत नव्हती. यामुळे त्यांच्यात मतभेद झाले आणि याचा कल्पनाने अतिविचार केला. ज्यामुळे तिच्यावर तणाव आला. कल्पना ४ मार्च रोजी एर्नाकुलमहून आली होती. खूप प्रयत्न करूनही तिला झोप येत नव्हती. याबद्दल ती “मी आठ गोळ्या घेतल्या. पण तरीही झोप येत नव्हती. मग मी आणखी १० गोळ्या घेतल्या. त्यानंतर काय झाले हे मला माहित नाही” असं म्हणाली.

कल्पनाने ( Kalpana Raghavendra ) पती प्रसादच्या एकाही फोन कॉल्सना उत्तर न दिल्याने त्याने कॉलनी वेल्फेअर असोसिएशनला याबद्दल कळवले. मग वेल्फेअर सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडून गायिकेच्या घरात प्रवेश केला तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर ती शुद्धीवर आली तेव्हा तिने पोलिसांना याबद्दलची माहिती देत या घटनेत दुसरा कोणीही सामील नाही असं सांगितलं.

कल्पना राघवेंद्रच्या मुलीने माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली?

कल्पनाची मुलगी दया प्रसाद हिनेही माध्यमांशी बोलताना आई कल्पनाच्या आत्महत्येच्या अफवांना नकार दिला. याबद्दल तिने स्पष्ट केलं की, “माझी आईला निद्रानाशाचा त्रास आहे. ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या घेत आहे. मात्र त्यादिवशी तिने जास्त प्रमाणात गोळ्या घेतल्याने आणि ती आजारी पडली. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. माझी आई आता पूर्णपणे ठीक आहे”.

गायिका कल्पना राघवेंद्रबद्दल…

दरम्यान, कल्पना राघवेंद्रबद्दल ( Kalpana Raghavendra ) सांगायचे झाले, तर ती दक्षिण संगीत क्षेत्रातली लोकप्रिय गायिका आहे. तिने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली. २०१३ पर्यंत तिने सुमारे १,५०० गाणी गायली आहेत. कल्पना ही प्रसिद्ध पार्श्वगायक टी. एस. यांची मुलगी आहे. २०१० मध्ये स्टार सिंगर मल्याळमचे विजेतेपद जिंकल्यानंतर कल्पनाला अधिक लोकप्रियता मिळाली.