दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या ‘थिरुचित्रम्बलम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटाने परदेशात आमिरच्या चित्रपटालाही मागे टाकलं. याबरोबरच धनुष मध्यंतरी ‘द ग्रे मॅन’ या मोठ्या हॉलिवूड चित्रपटात दिसला होता. धनुषच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं. आता धनुषच्या नव्या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली आहे तो म्हणजे ‘नाने वारुवेन’. या चित्रपटाचा दिग्दर्शन धनुषचा भाऊ सेलवाराघवन करत आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून यामध्ये धनुष हा नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिकांत बघायला मिळणार आहे. शिवाय या चित्रपटात धनुषचा डबल रोलही आपल्याला बघायला मिळणर आहे. चित्रपटाचं बरचसं चित्रीकरण उटी येथे झालं असल्याने नयनरम्य ठिकाणंही आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

चित्रपटाच्या टीझरमध्ये एकही संवाद नाही. त्यामुळे याच्या कथेविषयी आत्ता काहीही सांगणं कठीण आहे. चित्रपटाच्या टीझरवरुन हा खुर्चीला खिळवून ठेवणारा सस्पेन्स थ्रिलर असेल असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटात स्वीडीश अभिनेत्री एली अवरामदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमधून धनुष आणि एलीची जोडी फ्रेश वाटतीये आणि लोकांना चांगलीच पसंत पडली आहे. एली अवराम यामध्ये धनुषच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून निश्चित झालेली नाही.

आणखी वाचा : दिग्दर्शक अयान मुखर्जीने मानले शाहरुख खानचे आभार; म्हणाला “ब्रह्मास्त्रसाठी त्याने जे केलंय…”

या चित्रपटाच्या निमित्ताने धनुष हा त्याचा भाऊ सेलवाराघवन याच्या दिग्दर्शनाखाली प्रथमच काम करत आहे. दिग्दर्शक सेलवाराघवन यांनी पिंकव्हीलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, “धनुष हा अभिनेता म्हणूनच सेटवर वावरतो त्यामुळे आमच्यात वाद निर्माण होत नाहीत. तो संपूर्णपणे दिग्दर्शकाला शरण जाणारा अभिनेता आहे. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, हॉलिवूडमध्ये त्याने मोठ्या चित्रपटात काम केलं आहे शिवाय तो माझा भाऊ आहे, या सगळ्या गोष्टींचं दडपण असतंच. कदाचित त्यामुळे आपसूकच माझ्याकडून त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला जातो.”

Story img Loader