आपल्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत राहणारा अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. रणवीर सिंगनं अलिकडेच एका इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटनंतर रणवीर सिंगवर सोशल मीडियावरून बरीच टीका करण्यात आली. एवढंच नाही तर त्याच्यावर बरेच मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. एकीकडे रणवीर सिंगला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे तर दुसरीकडे बॉलिवूड सेलिब्रेटी मात्र रणवीर सिंगला पाठिंबा देताना दिसत आहेत. रणवीरच्या फोटोशूटनंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्यानंही रणवीरच्या पावलावर पाऊल ठेवत न्यूड फोटोशूट केलं आहे.
दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशालनं देखील रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटपासून प्रेरणा घेत न्यूड फोटोशूट केलं आहे. त्याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विष्णू विशालनं त्याचे सेमी न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करतानाच या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये फोटोग्राफरचं नाव सांगितलं आहे. विष्णू विशालचे हे फोटो त्याची पत्नी आणि भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केलं आहे. रणवीरनंतर आता विष्णू विशालचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
आणखी वाचा- रणवीर सिंग झाला न्यूड फोटोशूटमुळे ट्रोल, अर्जुन कपूर म्हणतो, “त्याला आवडतं ते…”
विष्णू विशालने त्याच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना लिहिलं, “चला… मी बऱ्यापैकी हा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे माझे हे फोटो माझ्या बायकोनेच क्लिक केले आहेत.” या फोटोंमध्ये त्याने पत्नी ज्वाला गुट्टाला देखील टॅग केलं आहे. विष्णू विशालनं बेडवर झोपून हे शूट केलं असून उशीचा वापर करून त्यानं लोअर बॉडी कव्हर केली आहे. या सर्वच फोटोंमध्ये त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसून येत आहे.
दरम्यान विष्णू विशालबद्दल बोलायचं तर तो एक तमिळ अभिनेता आहे. यासोबतच तो उत्तम क्रिकेटरही आहे. त्याने तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनमधून बरेच क्रिकेट सामने खेळले आहेत. २००९ सालापासून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विष्णू विशालनं मागच्याच वर्षी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाशी लग्न केलं आहे.