अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटातील कलाकार, त्यांचे डायलॉग, गाणी सर्व काही सुपरहिट झालं. त्यामुळे आता ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ बद्दल सतत नवनवीन अपडेट येत आहेत. अशातच अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी मानधन घेणार नसल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुन ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटात काम करण्यासाठी बक्कळ मानधन घेणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. निर्मात्यांकडून अभिनेता मोठी रक्कम घेणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता नुकत्याच आलेल्या काही वृत्तानुसार, अल्लू अर्जुन ‘पुष्पा २: द रुल’साठी कोणतेही मानधन घेणार नाहीये. तो फ्रीमध्ये या चित्रपटात काम करणार आहे. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो कोट्यावधीच कमाई करेल. हे कसं काय? अशा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
Pushpa 2 Box Office Collection Day 3
Pushpa 2 : ‘पुष्पा’ने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी! शाहरुखच्या ‘जवान’ला टाकलं मागे, आतापर्यंतची कमाई किती?
आशयाला प्रयोगशीलतेची जोड‘; लोकसत्ता लोकांकिका’ मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत विषयांचे वैविध्य

हेही वाचा – सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारासाठी केला खास पदार्थ; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “कधीच इतका…”

दरम्यान, अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २: द रुल’साठी कोणतेही मानधन घेण्यास नकार दिला असला तरी तो चित्रपटाने केलेल्या एकूण कमाईतून ३३ टक्के हिस्सा घेणार आहे. उदाहरणार्थ जर चित्रपटाने १००० कोटींचा गल्ला जमवला तर त्यामधील ३३ टक्के हिस्सा अल्लू अर्जुनला दिला जाणार आहे.

माहितीनुसार, ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स अ‍ॅमेझॉन प्राइमने ३० कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. आता अल्लू अर्जुनच्या या बहुचर्चित चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने देखील खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमने दिलेल्या रक्कमेपेक्षा तीन पट रक्कम नेटफ्लिक्सने या चित्रपटाच्या डिजिटल स्ट्रीमिंग राइट्ससाठी दिली आहे.

हेही वाचा – तमन्ना भाटियाशी लग्न कधी करणार? अभिनेता विजय वर्मा म्हणाला, “मी…”

‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागातील अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या ‘ऊ अंटवा’ या आएटम साँगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. पण आता ‘पुष्पा २’ मध्ये ती आएटम साँग करणार की नाही ही येत्या काळातच समजले.

Story img Loader