बॉलीवूडचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानने ‘पठाण’ चित्रपटाद्वारे तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि परदेशातही ‘पठाण’ चित्रपटाने चांगली कमाई केली. मात्र असे असूनही लोकप्रिय अभिनेत्यांच्या शर्यतीत शाहरुखला दाक्षिणात्य अभिनेत्याने मागे टाकले आहे. ऑरमॅक्स मीडियाने भारतातील लोकप्रिय अभिनेत्यांची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये बॉलीवूडच्या केवळ तीन अभिनेत्यांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नयनताराने विकत घेतले ५३ वर्ष जुने थिएटर कारण…

ऑरमॅक्स मीडियाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार भारतातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत बॉलीवूडचा किंग खान दुसऱ्या क्रमांकावर असून या शर्यतीत दक्षिणेतील मेगास्टार थलपथी विजय पहिल्या स्थानावर आहे. थलपथी विजय आणि शाहरुख खानच्या सोशल मीडिया फॉलोवर्समध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हेही वाचा : “कोकणची माणसं साधीभोळी…” मराठमोळी अभिनेत्री गुहागरमध्ये बनवतेय झाडू, नेटकरी मालवणीत म्हणतात “गो बाय…”

गेल्या काही दिवसांपासून थलपथी विजयच्या ‘लिओ’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच ‘पठाण’नंतर शाहरुख खानसुद्धा अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर नयनतारा मुख्य भूमिकेत असेल. ऑरमॅक्स मीडियाने २१ मे रोजी आपल्या ट्विटर हॅंडलवर लोकप्रिय अभिनेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत थलपथी विजय पहिल्या, शाहरुख खान दुसऱ्या, तर तिसऱ्या क्रमांकावर साऊथचा सुपरस्टार प्रभास आहे. प्रभास सध्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

चौथ्या क्रमांकावर अजित कुमार, पाचव्या क्रमांकावर राम चरण, सहाव्या क्रमांकावर ज्युनियर एनटीआर, सातव्या क्रमांकावर अल्लू अर्जुन, सलमान खान आठव्या, तर अक्षय कुमार आणि अभिनेता यश अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानांवर आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar beats shah rukh khan on most popular male film star in india sva 00