प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्याना तिच्या आजाराची माहिती दिली आहे. मागच्या काही महिन्यांपासून समांथा गंभीर आजाराशी झुंजत आहे. समांथाने तिच्या सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. समांथाची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हैराण झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “‘यशोदा’ ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे.” समांथाच्या या पोस्टनंतर तिचे चाहते सगळे चिंतेत आहेत. प्रत्येक जण तिला तब्येतीची काळजी घेण्यासाठी विनंती करत आहे.

आणखी वाचा : आमिर खानची आई मुंबईच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले…

अशातच दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांनीदेखील समांथाला एक पत्र लिहून तीचं मनोबल वाढवलं आहे. ही पोस्ट ट्विटरवर शेअर करत चिरंजीवी लिहितात, “प्रिय सॅम, आपल्या आयुष्यात वेळोवेळी असे कठीण प्रसंग येत असतात. तू परिस्थितीशी झुंजणारी मुलगी आहेस, मला खात्री आहे ती या कठीण काळातूनही बाहेर येशील, त्यासाठी परमेश्वर तुला शक्ति देवो हीच प्रार्थना.” चिरंजीवी यांच्या या पोस्टला शेअर कर समांथानेही त्यांचे आभार मानले आहेत.

चिरंजीवी यांचा नुकताच ‘गॉडफादर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. समांथा गेले काही दिवस या आजाराशी झुंज देत आहे. तिच्या ‘यशोदा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताचा प्रदर्शित झाला असून तिचे चाहते तिला या नव्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar chiranjeevi writes on twitter to samantha after myositis dignosis avn