दाक्षिणात्य अभिनेता धनुष हा सध्या त्याच्या ‘वाथी’ किंवा हिंदीत ‘सर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. धनुषचे चाहते त्याच्या या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत होते. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. धनुष सध्या पुन्हा चर्चेत आला आहे ते त्याच्या नव्या घेतलेल्या नव्या घरात राहायला आलं आहे. याचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता दिग्दर्शक सुब्रमण्यम शिवा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. त्यांनी धनुषच्या नव्या घरातील काही फोटोज शेअर केले आहेत. यात धनुष एकदम पारंपरिक वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळत आहे. निळा कुर्ता, पांढरी लुंगी, वाढलेले केस आणि दाढी या लूकमध्ये धनुष आपल्याला दिसत आहे. धनुषच्या या नव्या घराबद्दल त्याचं सगळ्यांनी अभिनंदन केलं.

आणखी वाचा : अब्दू रोजिकचा ‘झुमे जो पठाण’वरील डान्स व्हिडिओ व्हायरल; किंग खानवरील प्रेमापोटी केली ‘ही’ गोष्ट

सुब्रमण्यम आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “माझ्या धाकट्या भावासारखाच असलेल्या धनुषचे नवीन घर मला एखाद्या मंदिरासारखे वाटत आहे. आपल्या हयातीत त्याने आपल्या आई-वडिलांना एवढे सुंदर नंदनवन घराच्या स्वरूपात दिले आहे. आपल्या पालकांचा सन्मान कसा केला पाहिजे हे तुझ्या या कृतीतून स्पष्टपणे दिसत आहे, आणि यातूनच तरुण पिढीला तू प्रेरणा देत रहा.”

‘रिपब्लिक वर्ल्ड’च्या रीपोर्टनुसार धनुषचा हा नवा बंगला तब्बल १५० कोटींचा आहे. या नवीन घरात राहायला आल्यावर त्याने त्याच्या जवळच्या लोकांना एकत्र बोलावून एक छोटा कार्यक्रमही आयोजित केला आहे. धनुष आता त्याच्या आगामी ‘कॅप्टन मिलर’ या चित्रपटावर काम करत आहे. याबरोबरच त्याच्या आगामी ‘डी५०’ या चित्रपटावरही लवकरच काम सुरू होणार आहे. शिवाय नेटफ्लिक्सच्या ‘द ग्रे मॅन’च्या पुढील भागातही धनुष आपल्याला दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar dhanush and his family just reloacated to new house worth rs 150 crore avn