अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं फक्त दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नाही तर बॉलीवूडमध्येही आपली छाप उमटवली आहे. बॉलीवूडच्या रेखापासून ते बऱ्याच अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केलं आहे. त्यांचा आता चाहता वर्ग फक्त दक्षिणेत नसून उत्तरपर्यंत आहे. सध्या त्यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून जवळपास ६०० कोटींचा गल्ला जमवून ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी मोठी रक्कम घेतली आहे. त्यामुळे ते भारतातील सर्वात महागडे अभिनेते ठरले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – अभिनेत्री तेजश्री प्रधानला आवडतं ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ‘हे’ पात्र, म्हणाली….

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुख खानसारख्या तगड्या स्टार्सपेक्षाही जास्त मानधन घेणारे अभिनेते रजनीकांत ठरले आहेत. माहितीनुसार, ‘जेलर’चे निर्माते कालानिधि मारन यांनी अलीकडेच रजनीकांत यांची भेट घेतली. या भेटदरम्यान रजनीकांत यांना चित्रपटातील झालेल्या नफ्याच्या वाटणीचा धनादेश देण्यात आला. याबाबत चित्रपटाचे ट्रेड एनालिस्ट मनोबाला विजयाबालन यांनी सोशल मीडियाद्वारे कलानिधि मारन आणि रजनीकांत यांचे फोटो शेअर करून माहिती दिली आहे.

हेही वाचा – बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भाऊ हॉस्पिटलमध्ये दाखल; फोटो शेअर करत म्हणाली…

रजनीकांत यांना दिलेला धनादेश १०० कोटींचा असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी त्यांना चित्रपटासाठी मानधन म्हणून ११० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे आता एकूण ‘जेलर’ चित्रपटासाठी मिळालेलं मानधन २१० कोटी झालं आहे. म्हणून रजनीकांत भारताचे सर्वात महागडे अभिनेते ठरले आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला ‘हा’ क्षण आठवला की डोळ्यात येतं पाणी; म्हणाली, “करिअर संपलं…”

हेही वाचा – दहीहंडी सरावात सहभागी होऊन मराठमोळ्या अभिनेत्यानं लुटला आनंद; व्हिडीओ शेअर करत गोपाळ मित्रांना केली विनंती, म्हणाला…

एवढंच नाही तर ‘जेलर’चे निर्माते कलानिधि मारन यांनी धनादेशाबरोबर रजनीकांत यांना एक लग्जरी कार भेटवस्तू म्हणून दिली आहे. ही कार BMW X7 असून याची किंमत जवळपास १.२४ कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच कलानिधि यांनी रजनीकांत यांना अजून एक चित्रपट करण्यासाठी विनंती केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar rajinikanth became first highest paid actor after jailer success pps