दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मेगास्टार रजनीकांत चर्चेत असतात. रजनीकांत यांनी त्यांच्या कामाने संपूर्ण जगभर त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही त्यांनी यश मिळवलं. रजनीकांत यांच्या अभिनयात अशी जादू आहे की चाहते त्यांना देवाचा दर्जा देतात. नुकतीच रजनीकांत यांनी तिरुपती मंदिराला भेट दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रजनीकांत आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या हिने गुरुवारी पहाटे तिरुपतीमधील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले तसेच मंदिरात प्रार्थना केली. तसेच त्यांनी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध विधी केले. रजनीकांत आणि ऐश्वर्याचे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले.

“भगव्या वेशातील साधू बलात्कार…” ‘बेशरम रंग’ गाण्यावरून होणाऱ्या वादावर प्रकाश राज संतापले

बुधवारी वडील-मुलगी हे दोघे मंदिरात दाखल झाले होते आणि रात्रीच्या मुक्कामानंतर पहाटे दर्शन घेतले. नुकतेच रजनीकांत यांनी ७२ वर्षात पदार्पण केले आहे. सध्या या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रजनीकांत सध्या ‘जेलर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. नेल्सन दिलीप कुमार हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि आता लगेच या चित्रपटातील रजनीकांत यांचा लूक आउट करण्यात आला आहे. यात ऐश्वर्या राय बच्चनदेखील दिसणार आहे. याबरोबरच शिव कार्तिकेयन, प्रियांका अरुल मोहन, रम्या कृष्णन हे देखील चित्रपटात दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar rajnikanth along with daughter aishwarya taken blessing from tirupathi lord spg