अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलीवूडनंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत नशीब आजमावणाऱ्या जान्हवीकडे आता दोन मोठे चित्रपट आहेत. एक म्हणजे ‘देवरा’ आणि दुसरा ‘आरसी १६’. या चित्रपटामध्ये जान्हवी दाक्षिणात्य सुपरस्टार्ससह झळकणार आहे. नुकतंच जान्हवीच्या आगामी, बहुचर्चित ‘आरसी १६’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. याचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
६ मार्चला जान्हवी कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी निर्मात्यांनी ती ‘आरसी १६’ चित्रपटात झळकणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून तिच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे. नुकताच ‘आरसी १६’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील काही स्टार्स आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहिले होते. ‘आरसी १६’ या चित्रपटात जान्हवीसह झळकणारा राम चरण आपल्या कुटुंबासह या सोहळ्याला पोहोचला होता. शिवाय मेगास्टार चिरंजीवी देखील पाहायला मिळाले. तसेच सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर रेहमान यांनी सुद्धा हजेरी लावली होती. या सोहळ्याचे सध्या व्हिडीओ, फोटो चांगलेच चर्चेत आले होते.
हेही वाचा – ‘या’ गोंडस चिमुकलीला ओळखा पाहू! मराठी सिनेसृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री नुकतीच अडकली लग्नबंधनात
या सोहळ्यासाठी राम चरणने पारंपरिक लूक केला होता. धोती आणि कुर्तामध्ये राम पाहायला मिळाला. तसेच या सोहळ्यातील जान्हवीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ती सिल्व्हर ब्लू रंगाच्या साडीत दिसली. या साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
हेही वाचा – “तुम्ही अजूनही आहात..”, शाहीर साबळेंच्या स्मृतिदिनानिमित्ताने नातू केदार शिंदेंची भावुक पोस्ट, म्हणाले…
दरम्यान, बुची बाबू सना दिग्दर्शित ‘आरसी १६’ चित्रपटाचा पहिला लूक राम चरणच्या वाढदिवसाच्या दिवशी (२७ मार्च) प्रदर्शित होण्याची अधिक शक्यता आहे. याशिवाय चित्रपटाचं नाव अधिकृतरित्या जाहीर केलं जाऊ शकतं. कारण ‘आरसी १६’ हे चित्रपटाचं नाव अधिकृत नसून तात्पुरत्या स्वरुपाचं आहे.