अभिनेता राम चरण म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. RRR या चित्रपटामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. त्याचा चाहतावर्ग देखील खूप वाढला. आज जगभरात तयाचे करोडो फॅन्स आहेत. तर आज राम चरणचा वाढदिवस आहे. फक्त सिनेमाच नाही तर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या राम चरण मोठ्या संपत्तीचा मालक आहे.
हैदराबादच्या श्रीमंतांच्या यादीत राम चरण आणि त्यांच्या कुटुंबाचा समावेश आहे. तो हैदराबादमधील जुबली हिल्सच्या प्राइम लोकेशनवर असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत ३८ कोटी रुपये आहे.
अभिनयाबरोबरच राम चरणला कारचं वेड आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे रोल्स रॉयस फँटम ही आलिशान कार आहे. या कारची किंमत ७ कोटी रुपये आहे. तर याशिवाय त्याच्याकडे ३ कोटींची अॅस्टन मार्टिन V8 कार देखील आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे रेंज रोव्हरही आहे.
कार्सबरोबरच त्याला घड्याळांचीही आवड आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्याकडे ३० वेगवेगळ्या प्रकारची महागडी घड्याळं आहेत. त्याने नॉटिलस ब्रँडचे Patek Philippe घड्याळ खरेदी केलं होतं, ज्याची किंमत ८० लाख रुपये आहे. याबरोबरच त्याच्या घड्याळांच्या कलेक्शनमध्ये देखील लाखो रुपयाची घड्याळं आहेत.
हेही वाचा : “अभिनेता राम चरणला ऑस्कर द्या…”; चाहत्यांच्या मागणीने धरला जोर
तर रामचरण एका प्रोडक्शन कंपनीचा मालकही आहे. या कंपनीचं ऑफिस हैदराबादमध्ये आहे. या कंपनीअंतर्गत अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तर रामचरण एका चित्रपटासाठी १२ ते १५ कोटी मानधन आकारतो. याबरोबरच तो ट्रूजेट एअलाइन्स कंपनीचा चेयरमन आहे. या कंपनीत त्यानं १२७ कोटींची गंतवणूक केल्याचं म्हटलं जातं. तो स्वत:च्या प्रवासासाठीही त्याच्या प्रायव्हेट जेटलाच पसंती देतो. अभिनय क्षेत्र आणि त्याचे इतर बिजनेस अशी मिळून त्याची एकूण १३०० कोटींची संपत्ती आहे.