साऊथची सुपरस्टार समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या खुशी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात समांथाबरोबर अभिनेता विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. दरम्यान समांथाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच समांथा राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा- डबिंग स्टुडिओत हृदयविकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, ‘जेलर’ ठरला अखेरचा चित्रपट

prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
marathi actress hemal ingle kelvan photos
थायलंडला बॅचलर पार्टी, कोल्हापुरात केळवण! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई; फोटो आले समोर
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स
Akshaya Deodhar and Hardeek Joshi
राणादा अन् पाठकबाई पुन्हा एकत्र झळकणार? अक्षया देवधरच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चा, पाहा व्हिडीओ

ईटाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, समांथाने नेहमीच शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वीही ती अनेकदा तेलंगणातील जनता आणि शेतकऱ्यांना समर्थन देताना दिसून आली होती. इतकंच नाही तर ती तेलंगणाच्या हातमागाच्या कपड्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. समांथा के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये सामील होऊ शकते. मात्र, अद्याप समांथा किंवा पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

समंथाने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत आजारपणामुळे एक वर्षाचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले होते. समंथा मायोसिटिस नावाच्या स्वयंप्रतिकार रोगाशी झुंज देत आहे. २०२२ मध्ये तिने याबाबत खुलासा केला होता. सध्या समांथा केवळ स्वतःच्या तब्येतीवर लक्ष देत आहे.

हेही वाचा- “त्यांना मतं मांडण्याचा हक्क”, उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावर कमल हासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तमिळनाडू हे…”

समंथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा शकुंतलम चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट म्हणावी तशी कमाई करु शकला नाही. आता ‘खुशी’ चित्रपटानंतर ती लवकरच ‘सिटाडेल इंडिया’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. बॉक्स ऑफिसवर ‘खुशी’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर समांथाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Story img Loader