सध्या कोणत्याही चित्रपटाचं यश अपयश हे त्याच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून ठरतं. शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली, पाठोपाठ दाक्षिणात्य चित्रपट ‘पीएस २’नेही ४ दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार केला, सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’नेही चांगली कामगिरी केली. एकूणच या चित्रपटांची कमाई हे चित्रपट किती यशस्वी ठरले हे ठरवते.

बॉक्स ऑफिसच्या कमाईबरोबरच चित्रपटाच्या निर्मात्यांना इतर माध्यमांतूनही प्रचंड नफा होतो. चित्रपटाच्या संगीताचे हक्क, डिजिटल म्हणजेच ओटीटी स्ट्रीमिंगचे हक्क, टेलिव्हिजनचे हक्क, अशा वेगवेगळ्या मार्गातून सध्याचे चित्रपट निर्माते त्यांचे बऱ्यापैकी पैसे परत मिळवतात. एखाद्या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच केली अमुक अमुक कोटींची कमाई अशा बातम्या आपल्याही वाचनात येतात, ती कमाई मुख्यत्वे या माध्यमातून येते.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
Thane Water pipe connection, Thane arrears Water connection, Thane Water, Thane latest news, Thane marathi news,
ठाण्यात थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत, ठाणे महापालिकेची कारवाई

आणखी वाचा : ‘The Kerala Story’ पाहणाऱ्यांना आळंदीच्या रिक्षाचालकाकडून मोफत ऑटोसेवा; हिंदू महिलांसाठीसुद्धा एक ‘विशेष’ सेवा

अशाच एका आगामी दाक्षिणात्य चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ओटीटी हक्कांच्या माध्यमातून तब्बल ८० कोटी कमावले आहेत. सिरुथाई शिवा या दिग्दर्शकाचा आगामी चित्रपट ‘कंगुवा’चे डिजिटल हक्क अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने चक्क ८० कोटींना विकत घेतले आहेत. इतकंच नाही तर हे हक्क फक्त दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटासाठी असल्याचं निर्मात्याने स्पष्ट केलं आहे.

या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अजून फक्त या चित्रपटाची घोषणा झालेली आहे. याचया टीझर ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘कंगुवा’ हा चित्रपट तब्बल १० भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सूर्याबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीदेखील दिसणार आहे. या चित्रपटातून दिशा तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Story img Loader