दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार आणि जोड्या नेहमीच चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता विजय देवरकोंडा व अभिनेत्री रश्मिका मंदाना. गेल्या कित्येक वर्षांपासून विजय-रश्मिकाच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. अनेक फोटो आणि व्हिडीओमधून दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं आहे. पण दोघांनी आजपर्यंत नात्याबाबत मौन पाळलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी, विजय देवरकोंडा व रश्मिका मंदानाने एकत्र नवं वर्ष साजर केल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता या रुमर्ड कपलच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे सध्या विजय-रश्मिका चांगलेच चर्चेत आले आहेत.

हेही वाचा – Video: लेकीच्या लग्नात आमिर खानचा ‘ठरकी छोकरो’वर जबरदस्त डान्स, किरण रावसह थिरकला अभिनेता, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, विजय-रश्मिकाची पहिली भेट ‘गीता गोविंदम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. दोघांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. त्यानंतर विजय-रश्मिका ‘डिअर कॉमरेड’मध्ये झळकले होते. दोघांचा हा देखील चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. आता ही ऑनस्क्रीन हिट ठरलेली जोडी लवकरच साखरपुडा करणार आहे, अशी चर्चा रंगली आहे.

‘पिंकविला’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना लवकरच साखरपुडा उरकणार आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दोघांचा साखरपुडा होणार आहे. पण हे वृत्त किती खरं आहे, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

हेही वाचा – आयरा खानपेक्षा श्रीमंत आहे नुपूर शिखरे, लग्नानंतर दोघं आहेत ‘इतक्या’ संपत्तीचे मालक

दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी विजयचा ‘खुशी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूबरोबर प्रमुख भूमिकेत झळकला होता. लवकरच विजयचा ‘फॅमिली स्टार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर रश्मिका ‘पुष्पा २’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ‘रेम्बो’ नावाच्या तेलुगू चित्रपटातही अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South superstar vijay deverakonda and rashmika mandanna to get engaged soon rumors goes viral pps