बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा त्याचे चित्रपट, बॉलिवूड, सिनेसृष्टी याबद्दल विविध वक्तव्य करतो. त्याची ही वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपासून सलमान खानने दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल एक वक्तव्य केले होते. दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? असा प्रश्न सलमानने केला होता. त्यावर नुकतंच एका दाक्षिणात्य सुपरस्टारने उत्तर दिले आहे.

‘केजीएफ’ स्टार अशी ओळख असलेला दाक्षिणात्य अभिनेता यश हा सध्या त्याच्या आगामी ‘केजीएफ चॅप्टर २’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी एका मुलाखतीत यशला सलमान खानच्या दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत? या प्रश्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, “असं काहीही नाही. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना अशाप्रकारचा प्रतिसाद कधीही मिळाला नव्हता. याची सुरुवात या ठिकाणी डब केलेल्या चित्रपटांमुळे झाली. अनेक प्रेक्षकांना ते चित्रपट आवडायला लागले.”

Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Suraj Chavan
गळ्यात हार घातला, पाया पडला, डोक्यावरून हात फिरवत सूरज चव्हाणने रूद्राप्रति ‘अशी’ केली कृतज्ञता व्यक्त; पाहा व्हिडीओ
sussane khan share photo of son hridaan and hrehaan
हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”
Neelu Phule And Prasad Oak
“मला त्याच वेळेला ऑस्कर…”, निळू फुलेंची आठवण सांगत प्रसाद ओक म्हणाला, “त्यांनी मला फोन केला आणि…”

“भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान…”, सलमान खानचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

“आम्ही दाक्षिणात्य चित्रपटाच्या डब करण्याची सुरुवात मनोरंजन किंवा निव्वळ विनोद म्हणून केली होती. कारण त्यावेळी त्या गोष्टीला कोणीही इतकं महत्त्व दिले नाही. मात्र त्यानंतर अनेक लोकांना चित्रपटातील कथा सांगण्याची पद्धत आणि तो चित्रपट याबाबत लोकांमध्ये आवड निर्माण होत गेले. हे सर्व काही एका रात्रीत घडलेले नाही. यासाठी अनेक वर्ष जावी लागली आणि त्यानंतर आता लोकांना हे चित्रपट आवडायला लागले. तसेच ‘बाहुबली’, एसएस राजामौली, प्रभास यांसारख्या कलाकारांनी थेट हिंदी चित्रपट प्रदर्शित करुन प्रेक्षकांना थेट जोडण्याची संधी दिली”, असेही यश म्हणाला.

यापुढे यशने म्हटले की, “आमच्या संस्कृतीत अनेक मतभेद असतात. पण त्यामुळे ती आपली कमजोरी न बनता ताकद बनायला हवी. आमच्याकडील अनेक चित्रपट हे सुपरहिट ठरले आहेत. मात्र मी स्वत: अनेक हिंदी चित्रपट पाहिले आहेत आणि मला ते फार आवडतात.”

“विशेष म्हणजे अनेक हिंदी चित्रपटांचे निर्माते दक्षिणेत उतरले आहेत. मात्र एखाद्या भाषेत चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी चांगला विषय, चांगले प्रॉडक्शन हाऊस यासारख्या इतर बाबींचाही विचार केला पाहिजे. यशच्या मते, निर्मात्यांनी चित्रपट विकू शकतील असे कलाकार शोधले पाहिजेत. तसेच तो चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल याचीही खात्री केली पाहिजे आणि लवकरच या सर्व गोष्टी होतील, अशी आशा मला आहे”, असेही त्याने म्हटले.

ऐश्वर्या रायच्या थोबाडीत मारल्याच्या आरोपावर सलमान खानने सोडलं मौन, म्हणाला “जर ती…”

‘केजीएफ: चॅप्टर वन’ हा १९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील पीरियड ड्रामा असून एका अनाथ माणसाची कथा आहे. अप्रतिम अभिनय, सुंदर दृश्ये आणि मनोरंजक कथेच्या संगमामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. यशचा ‘केजीएफ: चॅप्टर टू’ १४ एप्रिल २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात यशसोबत संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.