‘केजीएफ’ फेम अभिनेता यश याला या चित्रपटामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ या त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्याच्या कामाबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. त्याची एक जळक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आता अशातच त्याने एक किस्सा सांगितला आहे, जो ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान त्याला “तू केलेल्या डॅशिंग रोलचा तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काही परिमाण झाला का ?” असा प्रश्न त्याला विचारणात आला. यावेळी त्याने काही वर्षांपूर्वी घडलेला एक किस्सा त्याने सांगितला.
तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही एखादी भूमिका करता तेव्हा त्याचे विचार, त्याचं वागणं तुम्ही समजून घेता. त्यामुळे कधी कधी तुमच्या नकळत तुम्ही त्याच्यासारखे वागू लगता. काही वेळा त्या पात्राच्या वाईट सवयीही तुम्ही आचरणात आणता.”
हेही वाचा : “पूर्वी लोक दाक्षिणात्य चित्रपटांची खिल्ली उडवायचे पण…” ‘केजीएफ’ स्टार यशचं वक्तव्य
पुढे बोलताना यशने याबद्दलचं एक उदाहरणही सांगितलं. तो म्हणाला, “मी ‘राजधानी’ नावाचा चित्रपट करत होतो. तो माझा पहिला गॅंगस्टार चित्रपट होता. त्या चित्रपटात प्रत्येक सीनमध्ये मी माझ्या पॅंटच्या मागच्या खिशातून बंदूक काढून सर्वांना धमकवायचो. एक दिवस मी ट्राफिकमध्ये अडकलो होतो आणि मी लोकांना धमकवायच्या अंदाजात बंदूक काढली. पण तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मी जे वागतोय ते चुकीचं आहे.” यशच्या या बोलण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.