एस एस राजामौली यांच्या बाहुबलीने देशातच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. बाहुबलीच्या यशानंतर त्यांनी दक्षिणेतील दोन बड्या स्टार्सना घेऊन RRR हा चित्रपट बनवला. या चित्रपटालादेखील मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. चित्रपटाला ऑस्करवारीत स्थान न मिळाल्याने केवळ देशातच नव्हे परदेशातील चित्रपट निर्माते नाराज झाले आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने राजामौली अमेरिकेत गेले होते. सध्या जगभर या चित्रपटाची हवा आहे.

अमेरिकेनंतर आता या चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी जपानला गेले आहेत. नुकतंच राम चरण जपानसाठी रवाना झाला आणि आता पाठोपाठ ज्युनिअर एनटीआरनेही हजेरी लावली आहे. आपल्या कुटुंबासह हे दाक्षिणात्य अभिनेते जपानमध्ये पोचले आहेत आणि देशभरात शक्य होईल तिथे जाऊन हे आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत.

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Hashtag Tadev Lagnam
तेजश्री प्रधान-सुबोध भावे पहिल्यांदाच एकत्र झळकणार; ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
suraj chavan shares reel video on riteish deshmukh ved song
रितेश देशमुखच्या सुपरहिट मराठी गाण्यावर सूरजचा जबरदस्त अंदाज! Video पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Bigg Boss Marathi Fame Nikki Tamboli And Arbaz Patel trip together
Bigg Boss नंतर निक्की-अरबाजची एकत्र पहिली ट्रिप! ‘या’ ठिकाणी गेलेत फिरायला, फोटो आले समोर

आणखी वाचा : १४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण, हॉलिवूड स्टार केविन स्पेसी यांची निर्दोष मुक्तता; नेमकं प्रकरण काय?

कुटुंब आणि मित्रमंडळींबरोबर ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण हे जपानच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. राम चरणने स्वतः हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं आहे “Together forever #RRR”. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर राम चरणने जपानमधील शाळांना भेट देऊन तिथे त्याने त्याच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे.

अमेरिकेप्रमाणेच जपानमध्येसुद्धा या चित्रपटाची चांगलीच हवा आहे. जपानी लोकांनी या चित्रपटाचं मनापासून स्वागत केलं आहे. २१ ऑक्टोबरला यह चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला तिथला प्रेक्षकवर्ग कसा प्रतिसाद देतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. शिवाय या चित्रपटाला ऑस्करच्या जनरल कॅटेगरीमध्ये स्थान मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.