दाक्षिणात्य अभिनेते भरत कल्याण यांनी आजवर छोट्या पडद्यावर उत्तमोत्तम काम करत कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या भूमिकांमुळे चर्चेत असणारे भरत यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरत यांची पत्नी प्रियदर्शनी यांचं आज (१ नोव्हेंबर) सकाळी निधन झालं. त्या ४३ वर्षांच्या होत्या. चेन्नई येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान प्रियदर्शनी यांनी अखेरचा श्वास घेतला.

आणखी वाचा – मुलांना शाळेतून घरी आणताना सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या गाडीला अपघात, मुलगी रुग्णालयात दाखल

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, चेन्नईच्या रुग्णालयामध्ये काही दिवसांपासून प्रियदर्शनी या कोमात होत्या. भरत यांच्या पत्नीने पलेओ डाएट करण्यास सुरुवात केली. डाएटमध्ये बदल झाल्यानंतर प्रियदर्शनी यांच्या शरीरावर परिणाम होऊ लागला. बदलतं डाएट हेच प्रियदर्शनी यांच्या आजाराचं मुख्य कारण होतं.

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान प्रियदर्शनी यांची प्रकृती आणखीनच बिघडत गेली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर (बुधवारी) प्रियदर्शनी यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.

आणखी वाचा – दक्षिण कोरियातील हॅलोवीन पार्टीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत प्रसिद्ध गायक-अभिनेत्याचा मृत्यु, २४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भरत कल्याण व प्रियदर्शनी यांना एक मुलगा व मुलगी आहे. भरत यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब कोलमडून गेलं आहे. तसेच दाक्षिणात्य कलाक्षेत्रामधील मंडळींनीही प्रियदर्शनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भरत कल्याण हे दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेते कल्याण कुमार यांचा मुलगा आहे. भरत यांनी आजवर अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Story img Loader