कोणीही मान्य करो किंवा न करो, करोना विषाणू आणि लॉकडाउनमुळे २०२० वर्ष हे नकोसं वाटायला झालंय. देवाने काहीतरी जादू करावी आणि उरलेले महिने पटपट निघून जावेत आणि नवीन वर्ष यावं असं वाटतंय. प्रत्येक माणसाची दिनचर्याच बदलून गेली असेल. एरवी रात्री १२ – १ वाजले की डोळ्यांवर झोप नाचायला लागते आणि नकळत मी निद्रादेवीच्या आधिन होऊन जातो. आजकाल ३-४ वाजले तरी डोळे टक्क उघडे असतात. झोपेचा लवलेशही डोळ्यावर नसतो. इरफान खान आणि माझी शेवटची भेट अशीच झाली.
लॉकडाउन काळात घरी बसून कारयचं तरी काय म्हणून हॉटस्टार ते नेटफ्लिक्स सगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबक्रिप्शन घेऊन झालंय. हॉटस्टारवर इरफानचा अंग्रेजी मीडियम पिक्चर आलेला दिसला. मी काही बॉलिवूडचा अस्सल चाहता वगैरे नाही. विरंगुळा म्हणून सिनेमा बघणारी आम्ही माणसं…पण काही अभिनेते हे थेट मनाला भिडतात. म्हणायला गेलात तर ते दिसायला हिरो मटेरियल नसतात. पण त्यांना स्क्रिनवर बघितलं की आपल्यातला एक माणूस तिकडे पोहचल्याची भावना येते, आणि असा माणूस जेव्हा सोडून जातो तेव्हा मनाला रुखरुख लागून राहते. इरफान खानचं जाण हे याच प्रकारातलं आहे.
अंग्रेजी मीडियम हा सिनेमा काहीसा खास आहे, आपल्या सर्वांसाठी आणि इरफान खानसाठीही. कॅन्सर सारख्या आजारावर मात करुन इरफान भारतात परतला. यामधून तो पूर्णपणे बरा झालेला नसतानाही त्याने अंग्रेजी मीडियमचं शुटिंग केलं. राजस्थानच्या एका शहरात वडिलोपार्जित मिठाईचं दुकान चालवणारा एक मध्यमवर्गीय माणूस. पत्नी बाळंतपणात जग सोडून गेली, पदरात एक सोन्यासारखी मुलगी. आई-वडिलांना नातू हवा पण पहिली मुलगी झाली म्हणून आनंदाने तिचा सांभाळ करणारा बाप इरफानने या सिनेमात रंगवला आहे. या सिनेमात तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकाराला इमॅजिन करु शकता, पण इरफान खान खऱ्या अर्थाने ती भूमिका जगला आहे.
प्रत्येक आई-बाप आपल्या मुलाने मोठं होऊन नाव कमावावं असं स्वप्न बाळगून असतात. इरफानचंही तेच स्वप्न असतं. पण आपल्या लाडक्या लेकीने लहानपणापासून पाहिलेलं परदेशात शिकायला जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ इरफानच्या अंगावर येते. वडिलोपार्जित मिठाईचं दुकान, जमिनीचा तुकडा, भाऊ आणि जिगरी मित्र यांच्या मदतीने इरफान मुलीसाठी पैसा उभा करतो. पण हे सगळं करत असताना, माझी लेक माझ्यापासून दूर जाणार ही भावना कायम मनात असते. पहिल्याच प्रसंगात लंडनला पोहचल्यानंतर इरफान आणि त्याचा भाऊ दिपक डोब्रियालला गैरसमजातून भारतात डिपोर्ट करतात. भारतात परतल्यानंतर आपल्या मुलीचा आवाज ऐकल्यानंतर सैरभैर झालेल्या इरफानमध्ये तुम्ही सहज तुमच्या बाबांना पाहू शकता. एखादा कलाकार एक भूमिका जिवंत करतो म्हणजे काय तर हेच…
मुलीला भेटण्यासाठी दुबईत जाऊन पाकिस्तानच्या पासपोर्टवर लंडनला जाणं, आपल्यामुळे मुलीला कोणताही त्रास होऊ नये यासाठी आपण डिपोर्ट झाल्याची बातमी तिला न समजू देणं, लंडनमधील कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी वडिलोपार्जित दुकानाच्या नावाचे हक्क विकणं या सर्व गोष्टी इरफानने अगदी सहज निभावल्या आहेत. मुलगी लंडनला पोहचल्यानंतर तिला अचानक आपला बाप ‘देशी’ वाटायला लागतो. आपल्याला हवंतसं आयुष्य जगता यायला हवं आता तुम्ही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करु नका हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा मनातला राग गिळून मुलीला काही कमी पडायला नको म्हणून धावपळ करणारा इरफान त्यावेळी तुम्हाला मोठा माणूस वाटायला लागतो. बॉलिवूडची दुनिया ही झगमगाटाची दुनिया आहे असं म्हटलं जातं. पण इरफानसारखे कलाकार बॉलिवूड आणि सामान्य माणसाची नाळ जोडून ठेवतात.
अगदी खरं सांगायचं झालं तर इरफानचे फार कमी सिनेमे मी पाहिले असतील, पण ज्या-ज्या सिनेमांमध्ये त्याला पाहिलंय त्यावेळी त्याच्या अधिक प्रेमात पडायला होतं. त्याच्या सहज अभिनयाला डोळ्यात साठवून तुम्ही झोपता. सकाळी उठल्यावर चहाचा पहिला घोट घेताना तो हे जग सोडून गेल्याची बातमी तुम्हाला कळते. विश्वास ठेवा, त्याक्षणी तुम्हाला खऱ्या अर्थाने धक्का बसतो. इरफान जाता जाता काय देऊन गेला, तर सहज, साधं आणि सोपं आयुष्य जगा हा महत्वाचा संदेश.