वायकॉम १८ आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग गुरुवारी लष्करातील जवानांना दाखविले. हा चित्रपट भारताचे विख्यात धावपटू मिल्का सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. मिल्खा सिंग यांची खेळाडू म्हणून कारकीर्द लष्करी सेवेतच सुरु झाली होती. ते माजी लष्करी अधिकारी असल्याने हे स्पेशल स्क्रीनिंग होत आहे. “देशाचे संरक्षण करणा-या शूर सैनिकांसाठी या चित्रपटाचे हे विशेष आयोजन करण्यात आले आहे,” असे यूएफओ मूव्हीजचे व्यवस्थापकीय संचालक कपिल अग्रवाल म्हणाले.
‘भाग मिल्खा भाग’ आज शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader