समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था यातील खलप्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या ‘पाटील’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २८ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा. लि., सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा. लि. निर्मित ‘पाटील : संघर्ष प्रेम आणि अस्तित्वाचा’ या चित्रपटात प्रेरणादायी संघर्षकथेची राजकीय पार्श्वभूमी दाखवतानाच कृष्णा आणि पुष्पा यांची हळुवार प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तत्पूर्वी राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींसाठी या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचं आयोजनही केलं होतं. राज्याच्या विधीमंडळाचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते या खास शोसाठी आवर्जून उपस्थित होते. यात आमदार डी.पी सावंत, बच्चू कडू, सतेज पाटील, प्रशांत ठाकूर, प्रसाद लाड, रामराव वाडकूते, संतोष टार्फे, राजेंद्र नजरधाने, तानाजी मुटकुळे, हेमंत पाटील अशा विविध पक्षांच्या १०० हून अधिक आमदारांनी हा चित्रपट पाहिला. स्क्रीनिंगनंतर सर्वपक्षीय नेतेमंडळींनी कलाकारांच्या अभिनयकौशल्याची आणि चित्रपटाची प्रशंसा केली. चित्रपटाचं कथानकही उपस्थितांची दाद मिळवून गेलं. राजकीय नेत्यांना भावलेला ‘पाटील’ प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

वाचा : ..तर ‘बाहुबली’मध्ये दीपिकाने साकारली असती ‘देवसेना’ 

ग्रामीण भागातून आलेल्या आणि अतिशय खडतर परिस्थितीचा सामना केलेल्या संतोष राममीना मिजगर यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेल्या ‘पाटील’ चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special screening of marathi movie patil for politicians