स्टारडम काय असतं हे श्रीदेवीला Sridevi विचारावं. ८० चं दशक या अभिनेत्रीने अक्षरशः गाजवून सोडलं होतं. तिच्या प्रत्येक सिनेमांनंतर तिच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली आणि ती आजता गायत कायम आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला होता तेव्हा आतापर्यंत कोणीही न पाहिलेली श्रीदेवी प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळाली होती. सध्या ती तिच्या आगामी ‘मॉम’ Mom सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहून एक चांगली कलाकृती पुन्हा एकदा पाहायला मिळेल अशी आशा प्रेक्षकांना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एक्स गर्लफ्रेंडने रोहित शर्माला ट्विटरवर केले ब्लॉक

नवाजुद्दीन सिद्दीकीचीही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. एक हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असलेला नवाजही श्रीदेवीसमोर संवाद बोलताना अनेकदा अडखळला होता. स्वतः नवाजने याची कबुली दिली. तो म्हणाला की, संपूर्ण सिनेमात श्रीदेवीसोबत त्याचे फक्त तीन सीन आहेत. पण ते तीन सीन करतानाही तो अनेकदा अडखळायचा, चुकीचा शब्द बोलायचा किंवा संवादच विसरायचा.

बोनी कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या ते या सिनेमावर इतके खूश आहेत की लवकरच ते त्यांचं दुसरं प्रोजेक्टही घरच्या कलाकारांना एकत्र घेऊन करणार आहेत. ‘मिस्टर इंडिया २’ Mr India 2 हा सिनेमा करण्याच्या बेतात बोनी कपूर आहेत. मिस्टर इंडियामध्ये श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत आजही या सिनेमाचे नाव आवर्जुन घेतले जाते.

४४ वर्षांचा अनुराग कश्यप २३ वर्षांच्या मुलीला करतोय डेट

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोनी कपूर सध्या या सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. श्रीदेवी आणि अनिल यांच्यासोबत अजून एक जोडी या सिनेमात घेण्यात येणार असून जिथे मूळ ‘मिस्टर इंडिया’ची कथा संपते तिथून पुढे दुसऱ्या भागाची कथा सुरू होणार आहे. पण पुढचा भाग करायचा आहे म्हणून काहीही करण्यात अर्थ नाही हे बोनी पुरेपूर जाणून आहेत. म्हणून ते सध्या या सिनेमाच्या कथेवर फार मेहनत घेत आहेत.
मिस्टर इंडिया सिनेमाचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केले होते. पण दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन ते करणार नाहीत हे आधीच स्पष्ट झालं आहे. त्यामुळे ‘मिस्टर इंडिया २’ साठी राकेश ओमप्रकाश मेहरा किंवा ‘मॉम’ सिनेमाचे दिग्दर्शक रवी उद्यावर यांची नावे चर्चेत आहेत.