बॉलिवूडच्या अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता अनिल कपूरची जोडी ही मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. त्या दोघांच्या ‘बेटा’ चित्रपटाने सगळ्यांची मने जिंकली होती. मात्र, या आधी या चित्रपटात माधुरीच्या जागेवर श्रीदेवी दिसणार होत्या. मात्र, त्यांनी या चित्रपटासाठी अचानक नकार दिला. या गोष्टीवरून श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात भांडण देखील झाले होते.

१९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेटा’ या चित्रपटातील अनिल कपूर आणि माधूरी दीक्षितच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, या चित्रपटासाठी इंद्र कुमार यांची पहिली पसंत या श्रीदेवी होत्या. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य चित्रपटचा ‘बेटा’ हा चित्रपट हिंदी रिमेक होता. या चित्रपटात श्रीदेवी आणि चिरंजीवी यांची जोडी पाहायला मिळाली होती. त्यानंतर हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी श्रीदेवी यांनी होकार दिला होता. मात्र, त्यानंतर अचानक त्यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील बबीताजी जेठालाल नव्हे तर नऊ वर्षांनी लहान असलेल्या ‘या’ अभिनेत्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये?

त्यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यांत भांडण झालं होतं. श्रीदेवी यांचे मॅनेजर हरी सिंग यांना बोनी कपूर खूप काही बोलले होते. त्यावेळी श्रीदेवी आणि बोनी कपूर रिलेशनशिपमध्ये नव्हते. त्यांच्यात सुरुवातीला भांडण झालं होतं. त्यानंतर इंद्र कुमार बोनी कपूर यांना म्हणाले की जर श्रीदेवी यांना हा चित्रपट करायचा नसेल तर त्यांना घ्यायला नको, नाही तर त्यांना असं होईल की मला हा चित्रपट करायचा नव्हता आणि मी हा केला. त्यानंतर त्यांनी माधुरीला घेण्याचा निर्णय घेतला, असे इंद्र कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले.

आणखी वाचा : ‘मी मुस्लीम असल्यामुळे…’, ब्रा फ्लॉन्ट केल्याने ट्रोल झालेल्या उर्फी जावेदचा ट्रोलर्सला सवाल

दरम्यान, ‘बेटा’ या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत अनिल कपूर, अनुपम खेर आणि अरूणा इराणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. अनिल कपूर, माधुरी तसेच अरुणा यांना चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर, सरोज खान यांना धक-धक या गाण्याच्या उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी पुरस्कारही मिळाला.

Story img Loader