बॉलीवूडची एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री आणि दीवा श्रीदेवीने खूप वर्षांनंतर इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पुर्नपदार्पण केले. पण, या चित्रपटाच्या यशानंतरही श्रीदेवीच्या आगामी चित्रपटांबाबत काहीच चर्चा ऐकू आलेली नाही. मात्र, असे असतानाही काहीना काही कारणास्तव ती चर्चेत असेतच. त्यामुळे श्रीदेवी या मनोरंजन जगतापासून दुरावलेली आहे, असे म्हणता येणार नाही.
नुकतीच ती लखनौ येथे झालेल्या दुर्गापूजेला उपस्थित होती. त्यावेळी, तिने दुर्गा पूजा केली आणि त्याचसोबत सिंदुर खेला या त्यांच्या पारंपारिक खेळाचाही आनंद लुटला. श्रीदेवीने प्रथेप्रमाणे पती बॉनी कपूर यांचे नाव कुकुंवाने पाठीवर लिहून घेतले.
(सौजन्यः बॉलीवूड मुव्हिज)