बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी ही इंस्टाग्राम या सोशल साईटवर सक्रीय असते. तिची छायाचित्रे सोशल मीडियावर वेळोवेळी चर्चेचा विषय देखील ठरली आहेत. नुकतेच इंस्टाग्रामवरील एका छायाचित्रावर तिच्या काही फॉलोअर्सने आक्षेपार्ह कमेंट केली. त्यावर खुशीनेही एक सविस्तर पोस्ट टाकून ‘त्या’ फॉलोअर्सला फटकारले.
मी आत्मविश्वासू असून मला जे चांगले वाटते ते मी इंस्टाग्रामवर शेअर करत असते. दिखाऊपणा किंवा सवंग प्रसिद्धीसाठी मी माझी छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट करत नाही. स्वत:ला आवडणारी अशी माझी वेगळी स्टाईल आहे. मी कोणासारखे होऊ इच्छित नाही. इंस्टाग्राम हे समाजमाध्यम असल्यामुळे त्यावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण आक्षेपार्ह कमेंट करणे असा याचा अर्थ होत नाही. त्यामुळे कोणतेही आक्षेपार्ह विधान मांडण्याआधी दोनवेळा विचार करावा. एखाद्या मुलीची तिच्या वेशभुषा आणि तिच्या स्टाईलवरून बदनामी करणे म्हणजे तुमच्यातील संकुचित विचारसरणीचे द्योतक असते, असे खुशीने नमूद केले आहे.
१५ वर्षीय खुशीचे इंस्टाग्रामवर ७० हजारांच्या घरात फॉलोअर्स आहेत. आई श्रीदेवी तसेच आपल्या मित्रपरिवारासोबतची छायाचित्रे खुशी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवटरून शेअर करत असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा