बॉलिवूडची सूपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांची आज पुण्यतिथी. २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवी यांचा बाथटबमध्ये बुडून अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला. त्यांची अकाली एक्झिट कोट्यवधी चाहत्यांच्या मनाला चटका लावून लागली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुलगी जान्हवी कपूर हिनं आपल्या आईसाठी एका भावुक पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जान्हवीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईच्या हातात आपले छोटेसे हात दिलेला एक कृष्णधवल फोटो शेअर केला आहे. ‘माझं हृदय नेहमीच जड झालेलं असतं पण मी चेहऱ्यावर हसू ठेवून वावरते कारण त्या हृदयात तू वास करत आहे’ अशी भावनिक ओळ जान्हवीनं श्रीदेवी यांच्यासाठी लिहिली आहे. श्रीदेवी लग्नसोहळ्यासाठी दुबईत गेल्या होत्या. त्यावेळी ‘धडक’चं चित्रीकरण सुरू असल्यानं जान्हवी मात्र श्रीदेवींसोबत दुबईत उपस्थित राहू शकली नाही. श्रीदेवींच्या शेवटच्या क्षणी जान्हवी त्यांच्यासोबत नव्हती. त्यानंतर एका मुलाखतीत आईसोबत त्यावेळी वेळ घालवता आला नाही यांचं दु:खही जान्हवीनं बोलून दाखवलं होतं.

आईच्या आपण सर्वाधिक जवळ होतो हे देखील जान्हवीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. जान्हवीनं ‘सैराट’चा रिमेक असलेल्या ‘धडक’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी श्रीदेवी यांनी जान्हवीवर खूपच मेहनत घेतली होती. जान्हवी स्वत: श्रीदेवी यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवत होती. आईनं आपला चित्रपट पाहावा आणि अभिनयाचं कौतुक करावं अशी जान्हवीची इच्छा होती मात्र ती इच्छा कधीही पूर्ण होवू शकली नाही.