अभिनयाचा किंचितही वारसा नसताना श्रीदेवींनी प्रचंड ऊर्जेद्वारे एकाच वेळी तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी चित्रसृष्टींत अविश्रांत अव्वल दर्जाचे काम करून ‘सुपरस्टार’ पद पटकावलं. त्यांची आज पहिली पुण्यतिथी. हिंदी येत नसतानाही त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याकाळच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या त्या बॉलिवूड अभिनेत्री होत्या.
Sridevi death anniversary : वो ‘चाँदनी’ गहरा ‘सदमा’ दे गई!
त्यांचा अभिनय, त्यांची लोकप्रियता पाहून हॉलीवूडमधील जगप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गही प्रभावित झाले. त्यांनी श्रीदेवी यांना ‘ज्युरासिक पार्क’मधली भूमिकेसाठी विचारलं होतं. मात्र श्रीदेवी यांनी ठामपणे चित्रपटासाठी नकार दिला. स्टीव्हन यांच्या चित्रपटात छोटी का होईना पण भूमिका साकारण्यासाठी कलाकार एका पायावर तयार होतात. मात्र श्रीदेवी यांना चित्रपटात छोटी भूमिका नको होती. मुख्य नायिकेची भूमिका वाट्याला न आल्यानं श्रीदेवींनी स्टीव्हन स्पीलबर्गला नकार कळवला होता. त्यांच्या या धाडसाचं त्यावेळी सर्वांनीच कौतुक केलं.
‘सदमा’, ‘इन्कलाब’, ‘मकसद’, ‘मवाली’,‘चालबाज’, ‘लम्हे’ ‘तोहफा’ ‘मिस्टर इंडिया’‘चांदनी’हिर रांझा’, ‘लैला मजनू’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘गुरुदेव’, ‘चंद्रमुखी’, ‘लाडला’, ‘जुदाई’, ‘नगीना’ यांसारख्या अनेक चित्रपटात श्रीदेवी यांनी काम केलं. २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईत बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला.