श्रीदेवी प्रभूदेवासोबत आगामी इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी (आयफा) पुरस्कर सोहळ्यात एक ‘डान्स पफॉर्मन्स’ करणार आहे. खूप वर्षांनंतर श्रीदेवी स्टेजवर नृत्य करताना प्रेक्षकांना दिसणार आहे. या कार्यक्रमात तिच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीतील हवा हवाई, न जाने कहा से आइ है, इंग्लिश विंग्लिश आणि अन्य काही गाण्यांवर ती प्रभूदेवासोबत नाचणार आहे. या गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन प्रभूदेवाच करणार आहे. यंदाचा ‘आयफा’ पुरस्कार सोहळा मकाउ येथे ४ जुलैपासून सुरु होणार आहे.

Story img Loader