बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख आणि दीपिका यांनी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटात परिधान केलेल्या पोशाखांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावातून मिळणा-या रक्कमेचा वापर सामाजिक मदतकार्यासाठी करण्यात येणार असून हा लिलाव चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चित्रपटात शाहरुख खानने डेनीम जॅकेट्स आणि गॉगल्स घातले आहेत, तर दीपिकाने नक्षीकाम केलेल्या कांजीवरम साडया परिधान केल्या आहेत.
शाहरूख आणि दीपिकाने याआधी २००७ साली आलेला सुपरहीट चित्रपट ‘ओम शांति ओम’ मध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर आता तब्बल सहा वर्षांनंतर ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार असून रोहित शेट्टीबरोबर त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. गौरी खानच्या ‘रेड चिलीज् एंन्टरटेन्मेंट’चा हा चित्रपट ९ ऑगस्टला ईद दिवशी प्रदर्शित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटातील शाहरुख-दीपिकाच्या पोशाखांचा लिलाव!
बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख आणि दीपिका यांनी चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटात परिधान केलेल्या पोशाखांचा लिलाव करण्यात येणार आहे.
First published on: 26-07-2013 at 07:34 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srk deepikas chennai express costumes to be auctioned for charity