शाहरुख त्याच्या आगामी ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाला प्रसिद्ध करण्याकरिता नवनवीन कल्पना आखत आहे. प्रसिद्ध पंजाबी रॅपर हनी सिंग ‘चेन्नई एक्सप्रेस’करिता एक विशेष गाणे तयार करणार असून ते गाणारसुद्धा आहे. हे गाणे शाहरुख आणि हनीसिंग प्रसिद्ध अभिनेता रजनीकांतला अर्पीत करणार आहेत.
हनीसिंग म्हणाला की, शाहरुखने ‘चेन्नई एक्सप्रेस’करिता गाणे तयार करण्यास सांगण्यासाठी आपल्याला फोन केल्यावर आश्चर्य वाटले. शाहरुख आणि मी रजनीकांतचे खूप मोठे चाहते आहोत. त्यामुळे हे गाणे आम्ही रजनीकांतला अर्पीत करणार आहोत. तसेच, विशाल-शेखरची सदर गाण्याबाबत असलेली नापसंती विचारली असता, आपण आपले काम करत असून हे गाणे प्रदर्शित झाल्यावर केवळ माझ्या आणि शाहरुखच्या नाही तर रजनीकांत यांच्या चाहत्यांनाही आवडेल, असे तो म्हणाला.

Story img Loader