हिंदी चित्रपटसृष्टीत कमालीची लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ चित्रपटातील शाहरूख खान आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पडद्यावर पाहता येणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ या चित्रपटात हे दोघेजणही बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहेत. सध्या हैदराबाद येथे या चित्रपटाचे अंतिम टप्प्यातील चित्रीकरण सुरू आहे. त्यावेळी चित्रीत करण्यात आलेल्या एका दृश्याचे छायाचित्र शाहरूखने ट्विटरवर अपलोड केले आहे. हे दृश्य  एखाद्या रोमँटिक आणि भावनिक प्रसंगाचे असल्याचा साधारण अंदाज छायाचित्र पाहताना येतो. त्यामुळे एकुणच या चित्रपटामुळे पुन्हा एकदा शाहरूख आणि काजोलची जुनी केमेस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येईल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येत्या १८ डिसेंबर रोजी हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader