भारतीय चित्रपटांचे चाहते आज संपूर्ण जगभरात देशभरात पसरले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप यांप्रमाणेच जपान, चीन यांसारख्या देशातही भारतीय चित्रपट आवडीने पाहिले जातात. एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतीयांना वेड लावलेच पण त्यानंतर या चित्रपटाने परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे. मध्यंतरी या चित्रपटाच्या ऑस्करवारीवरुन बरंच वादंग झालं होतं पण आता ‘आरआरआर’ला ऑस्कर इतक्याच एका प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी नुकतीच चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त जपानवारी केली. या दोन्ही स्टार्सचे जपानमध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या शुक्रवारी जपानच्या चित्रपटगृहात ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.‘आरआरआर’ हा जपानमध्ये पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. याबरोबरच या चित्रपटाला २५ ऑक्टोबर रोजी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ‘सॅटर्न पुरस्कार’ही घोषित केला आहे.

Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ
Stree 2 box office collection
‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…

आणखी वाचा : ‘वास्तव’च्या सेटवर संजय नार्वेकर यांना पायऱ्यांवर बसलेलं पाहून संजय दत्त म्हणाला…

५० वर्षंपूर्तीच्या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्यात वेगवेगळ्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता. ‘एफिल’, ‘राइडर्स ऑफ जस्टिस’, ‘साइलेंट नाइट’यासारख्या चित्रपटांना मागे टाकत ‘आरआरआर’ने यात बाजी मारली आहे. सॅटर्न पुरस्कार हे ‘एकेडमी ऑफ साइंस फिक्शन, फैंटेसी,हॉरर फिल्म्स’ कडून प्रदान करण्यात येतात. यामध्ये केवळ चित्रपटच नव्हे तर वेगवेगळ्या वेबसीरिजचासुद्धा समावेश होतो.

याविषयी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर राजामौली यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, “आमच्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. यासाठी मी माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या चित्रपटाला लोक पसंत करत आहेत.” या चित्रपटाने हिंदीत तब्बल २७४ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहेत तर जगभरात या चित्रपटाने ११०० कोटींचा आकडा पार केला आहे.