SS Rajamouli Dance Video:  भारतातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे एसएस राजामौली. दिग्दर्शनाबरोबरच ते पटकथा लेखक सुद्धा आहेत. ‘मगधीरा’, ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट करून राजामौली यांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ते अनेकांसाठी प्रेरणा आहेत. सध्या एसएस राजामौली एका डान्स व्हिडीओमुळे खूप चर्चेत आले आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

एसएस राजामौली ( SS Rajamouli ) यांचा व्हायरल व्हिडीओ पुतण्या श्री सिंहाच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील आहे. या व्हिडीओमध्ये राजामौली पत्नी रमा यांच्याबरोबर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये दोघांनी रवि तेजा आणि असिन यांच्या Amma Nanna O Tamila Ammai चित्रपटातील सुपरहिट गाणं Lunchkostava वर डान्स केला आहे. राजामौली आणि त्यांच्या पत्नीच्या केमिस्ट्रीचं खूप कौतुक होतं आहे. वयाच्या ५१व्या वर्षी एसएस राजामौली यांची ही एनर्जी तरुणाईला लाजवेल अशी आहे.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”
Marathi actress Pooja Sawant started preparations to celebrate the first Makar Sankranti after marriage
Video: लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी पूजा सावंत लागली तयारीला, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वेध…”

हेही वाचा – Video: किरण-वैष्णवीच्या सप्तपदीला ‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांनी वाजवला बँन्जो, पाहा व्हिडीओ

याआधीही एसएस राजामौली ( SS Rajamouli ) यांचा पत्नीबरोबरचा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. ऑस्कर विजेते एआर रेहमान यांच्या ‘अंदामैना प्रेमरानी’ या गाण्यावर राजामौली पत्नी रमा यांच्याबरोबर थिरकले होते.

हेही वाचा – ‘अशोक मा.मा.’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती, म्हणाली…

एसएस राजामौली ( SS Rajamouli ) यांच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’च्या यशानंतर आता ते महेश बाबूसह चित्रपट करत आहेत. या चित्रपटाचं शीर्षक अजून निश्चित झालेलं नाही. ‘पीकॉक मॅगजीन’शी संवाद साधताना महेश बाबू म्हणाला होता की, सध्या माझं लक्ष एसएस राजामौली यांच्याबरोबर करत असलेल्या मोठ्या चित्रपटाकडे आहे. हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होतं असल्यासारखं आहे. महेश बाबूबरोबर करत असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण जानेवारी २०२५पासून सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – “ना शितली, ना जयडी…”, किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरला ‘लागिरं झालं जी’च्या टीमने लग्नाच्या दिल्या हटके शुभेच्छा

एसएस राजामौली यांच्या पत्नी काय करतात?

२००१ साली एसएस राजामौली ( SS Rajamouli ) यांनी रमा यांच्याशी लग्न केलं होतं. राजामौली हे जसे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, तसंच पत्नी रमा या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिजाइनर आणि स्टाइलिस्ट आहेत. रमा राजामौली यांना सर्वोत्कृष्ट कॉस्ट्यूम डिजाइनरचा नंदी अवॉर्ड मिळाला आहे. राजामौली यांच्या ‘मगधीरा’, ‘ईगा’, ‘बाहुबली: द बिगिनिंग’, ‘बाहुबली २: द कन्क्लूजन’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषेची जबाबदारी रमा यांनीच सांभाळली होती.

Story img Loader