यंदाचा ऑस्कर भारतासाठी खास ठरला. ‘द एलिफंट व्हिसपर्स’ या शॉर्ट फिल्मला ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ या कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला. याबरोबरच बहुचर्चित एस.एस.राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यालाही ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत पुरस्कार मिळाला. पहिल्यांदाच भारताला एका गाण्याने ऑस्कर मिळवून दिला आहे. ‘नाटू नाटू’ला ऑस्कर मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
इतकंच नव्हे तर राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट जगभरात गाजतो आहे. जपानमधील बॉक्स ऑफिसवर तर याने गेले कित्येक दिवस ठाण मांडले आहे. हा चित्रपटही जपानमध्ये रोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. जपानमध्ये चित्रपटगृहात १ दशलक्षाहून अधिक लोकांची नोंद करणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. जपानमधील ४४ शहरे आणि प्रांतांमध्ये २०९ स्क्रीन्स आणि ३१ आयमॅक्स स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
आणखी वाचा : आवडता ‘आयपीएल’ संघ कोणता MI की CSK? गौतमी पाटीलने उत्तर देत केला आवडत्या खळाडूबद्दलही खुलासा
‘आरआरआर’ हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. चित्रपट निर्मात्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती शेअर करत सांगितले की, “चित्रपटाने त्याच्या थिएटर रनच्या १६४ दिवसांत १ दशलक्ष लोकांचा फूटफॉल्स रेकॉर्ड केले आणि अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.”
आणखी वाचा : “तो भोकं पडलेला टी-शर्ट, जुनी ट्रॅक पॅन्ट…” सैफ अली खानची स्टाईल अन् साधेपणाबद्दल करीना कपूरचा खुलासा
‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळाल्यावर या चित्रपटाच्या लोकप्रियतेमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, ‘आरआरआर’ ने जपानमध्ये आतापर्यंत ८० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि लवकरच हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाने जानेवारीमध्येच जपानच्या बॉक्स ऑफिसवर १०० दिवस पूर्ण केले.