भारतातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे एसएस राजामौली यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर एसएस राजामौलींनी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या या बायोपिकची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – सुबोध भावेच्या मुलांनी बाप्पासाठी केला आकर्षक ‘चांद्रयान ३’चा देखावा; पाहा फोटो

myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
Manoj Bajpayee
‘या’ प्रसिद्ध चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर मनोज वाजपेयी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार; म्हणाले, “आनंदाची बातमी…”
Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony
Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

ट्वीटरवर (X) एसएस राजामौली यांनी नव्या चित्रपटाची घोषणा करत एक टीझर शेअर केला आहे. आणि लिहीलं आहे की, “जेव्हा मी पहिल्यांदा चित्रपटाची कहाणी ऐकली तेव्हा मी भावुक झालो होतो. खरंतर बायोपिक करणं हे खूप अवघड काम असतं. पण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक यांच्यावर बायोपिक करणं त्याहूनही आव्हानात्मक आहे.”

हेही वाचा – राखी सावंतने आदिल खानबरोबरच्या लग्नाचे सर्व पुरावे केले उघड; म्हणाली, “मी इस्लाममधील नियमांचं पालन केलं अन् आता…”

एसएस राजामौली यांच्या नव्या चित्रपटाचं नाव ‘मेड इन इंडिया’ असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नितिन कक्कड यांच्यावर देण्यात आली आहे. तर एसएस राजामौली या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. नितिन कक्कड यांनी ‘फिल्मिस्तान’, ‘मितरों’, ‘नोटबुक’ आणि ‘जवानी जानेमान’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2023: ढोल ताशांच्या गजरात ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरच्या बाप्पाचं आगमन; पाहा व्हिडीओ

माहितीनुसार, ‘मेड इन इंडिया’ चित्रपट हा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळमबरोबर मराठीतही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाची प्रोसेस सुरू असून स्टारकास्टबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण चित्रपटाच्या टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये ‘मेड इन इंडिया’विषयी उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा – “हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार”; गायक सलील कुलकर्णींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

सध्या राजमौली हे महेश बाबूबरोबर एका चित्रपटाचे काम करत आहेत. हा एक एडव्हेंचर चित्रपट असणार आहे. ‘इंडियाना जोन्स’ सारख्या स्टाइलमध्ये हा चित्रपट बनवतं असल्याचं राजामौली यांनी सांगितलं.

Story img Loader