बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बाहुबली: दि बिगिनिंग‘ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे ५० कोटी रुपयांची कमाई करुन नवा विक्रम केला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी एवढी मोठी कमाई करणारा ‘बाहुबली’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस. एस. राजामौळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांनी आज शनिवार बाहुबली चित्रपटाबाबत ट्विटरवरून माहिती देताना सांगितले, की शुक्रवारी चार भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रचंड कमाई केली. तसेच, दोनच दिवसांमध्ये हा चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये समाविष्ट होईल, अशी आशा समीक्षकांनी व्यक्त केली आहे. सर्वात महागडा चित्रपट असलेला ‘बाहुबली’ १० जुलै रोजी प्रदर्शित झाला. वेगवेगळ्या भाषेत ४००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तेलुगुत सर्वात जास्त कमाई केली आहे. तमिळ आणि हिंदी भाषेतील या चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात राणा दग्गुबुत्ती, तमन्ना, अनुष्का शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘बाहुबली’ची पहिल्याच दिवशी ६० कोटींची कमाई
बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘बाहुबली: दि बिगिनिंग‘ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे ५० कोटी रुपयांची कमाई करुन नवा विक्रम केला आहे.
First published on: 11-07-2015 at 04:14 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ss rajamoulis baahubali mints rs 60 crore on release day